
AIDS control program
HIV cases in Yavatmal: जिल्ह्यात मागील काही वर्षात अचानक एचआयव्ही रुग्णांची संख्येत वाढ झाली होती. मात्र प्रशासनाच्या प्रभावी उपाययोजनामुळे ही संख्या आता नियंत्रित आहे. यावर्षात ८७५३४ जणांनी एचआयव्ही तपासणी केली, त्यामध्ये ऑक्टोबरपर्यंत १८३ रुग्णांची नोंद आहे. यामध्ये १७७ सामान्य रुग्ण तर ६ गरोदर मातांचा समावेश आहे. (World Aids Day)
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या समन्वयाने जिल्ह्यात प्रभावी जनजागृती व उपाययोजना राबविल्या जात आहे. त्यामुळे एचआयव्ही/ एड्स रुग्ण संख्या नियंत्रणात आली आहे. मागील २०२४-२५ या वर्षात ३६२ सामान्य व २३ गरोदर मातांची नोंद करण्यात आली होती. त्यामामाने ही रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याचे दिसत आहे. एचआयव्ही संसर्गाबाबत जागरूक करण्यासाठी जागतिक एड्सदिन दरवर्षी १ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. सर्व वयोगटातील लोकांमध्ये एड्सबद्दल जागरुकता निर्माण करणे हा मागचा उद्देश आहे.
जिल्हयामध्ये २००२ पासून वैद्यकीय महाविद्यालयामध्येआयसीटीसी केंद्र कार्यान्वित आहेत तसेच त्यांनतर २००६ पासून सर्व उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय येथे आयसीटीसी केंद्र स्थापित करण्यात आले. त्याचप्रमाणे औषधोपचारकरिता जिल्हास्तरावर एआरटी केंद्र व तालुकास्तरावर पुसद येथे एआरटी केंद्र कार्यान्वित आहे. यासर्व सोयी सुविधांवर नियंत्रण ठेवण्याकरिता २००९ पासून शल्यचिकित्सकांच्या नियंत्रणाखालीजिल्हा एड्स नियंत्रण पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यांच्या माध्यमातून सर्व उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयामध्ये एचआयव्ही/एड्स (HIV/ AIDS) हा कार्यक्रम प्रभाविपणे राबविला जात आहे. त्यामध्ये समुपदेशन व एचआयव्ही तपासणी, एचआयव्ही बाधित रुग्णांवर औषधोपचार केला जातो. तसेच सर्व गरोदर मातांना या कार्यक्रमांतर्गत मोफत औषधोपचार केला जात आहे.
World AIDS Day 2025: जागतिक एड्स दिनानिमित्त चिंताजनक बातमी, गर्भवती महिलांमध्ये HIV संसर्ग वाढला
जागतिक एड्स दिनानिमित्त सोमवारी (दि. १) आरोग्य विभागाने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. यावर्षीचे घोषवाक्य’ अडथळ्यांवर मात करून एचआयव्ही/एड्सविरोधातील लढा अधिक सक्षम बनवूः एकत्र येऊन नवं परिवर्तन घडवूया’ आहे. याअंतर्गत जिल्हा सामान्य रूग्णालयाने प्रभातफेरी गुरुवारी (दि. ४) बाइक रॅली आणि सोमवारी (दि. १) पुसद शहरात बाईक रॅलीचे आयोजन केले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालयामध्ये रेड रिबन ला स्थान करण्यावर भर देण्यात येत आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांच्यामध्ये एचआयव्ही एड्सबद्दल जनजागृती निर्माण होईल तसेच संपूर्ण जिल्ह्यात अतिजोखीम गढ़, युवा वर्ग, स्थलांतरीत नागरिकांमध्ये पथनाट्च यासह विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
– प्रीती दास, जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा एड्स प्रतिबंध
आरोग्य विभागाच्या प्रभावी जनजागृती कार्यक्रमाने एचआयव्ही एड्स संक्रमण नियंत्रित आहे. १ डिसेबर जागतिक एड्स दिनानिमित्ताने जास्तीत जास्त नागरिकांन स्थत हाची एचआयव्ही तपासणी करून घ्यावी तसेच जे उपचारापासून दुरावले आहे उपचारात खंड पडलेला आहे अशा सर्वांनी पुन्हा एचआयव्ही एड्स कार्यक्रमाशी जुळावे,
– डॉ. सुखदेव राठोड जिल्हा शल्यचिकित्सक यवतमाळ