मुंबई गोवा महामार्गावर(Mumbai Goa Express Highway) रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे शिवशाही बस आणि अर्टिगा कार यांचा भीषण अपघात झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ९:१५ च्या सुमारास घडली असून दोन्ही वाहने एकमेकांच्या समोर येऊन आदळल्यामुळे हा अपघात घडला. या अपघातात २ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नवी मुंबईच्या एमजीएम (MGM)रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघात ग्रस्थ झालेल्या शिवशाही बसचा क्रमांक MH ०९ EM ३५३० हा असून ही बस खेड -ठाणे या मार्गावर जात होती. तर मारुती सुझुकी इरटिगा वाहन क्रमांक MH ०५ CV ३२९९ ही गाडी कोकणच्या दिशेने जात होती. वाहन चालकाने चुकीच्या बाजूने वाहन चालविल्याने हा भीषण अपघात घडला असल्याचे समोर आले आहे. खेड ते ठाणे ही शिवशाही बस (गणपती जादा) मार्गावर धावत असताना पोलादपूर येथे स्टेट बँकेसमोर आली असता समोरून येणारी मारुती सुझुकी इरटिगा क्र. MH ०५ CV ३२९९ वरील चालकाने चुकीच्या बाजूने वाहन चालवत बसला समोरील बाजूस धडक दिली. या अपघातात बस मधील प्रवासी अथवा चालक/वाहक यांना कोणतीही दुखापत झाली नसून अन्य वाहनातील ३ व्यक्ती जखमी झाले असून त्यातील २ व्यक्तींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस स्टेशन येथे करण्यात आलेली आहे.
अपघातात मृत्यू आणि जखमी झालेले प्रवासी :
जयवंत सावंत (६०) अंबरनाथ मयत
किरण घागे (२८) घाटकोपर मयत
गिरीश सावंत (३४) अंबरनाथ जखमी
अमित भीतळे (३०) बदलापूर जखमी
जयश्री सावंत (५६) अंबरनाथ जखमी