Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pandharpur News : चंद्रभागेच्या तीरी उसळला जनसागर; माघी यात्रा उत्साहात, ‘जय हरी विठ्ठला’च्या जयघोषाने दुमदुमली पंढरी

चंद्रभागेच्या तिरी, उभा मंदिरी, तो पाहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जयहरी, असंच काहीसं चित्र सध्या पंढरपुरात पाहायला मिळालं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठ्ठलाची ओढ महाराष्ट्रातल्या प्रत्येक भाविकाला असते.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 31, 2026 | 12:41 PM
Pandharpur News : चंद्रभागेच्या तीरी उसळला जनसागर; माघी यात्रा उत्साहात, ‘जय हरी विठ्ठला’च्या जयघोषाने दुमदुमली पंढरी
Follow Us
Close
Follow Us:
  • चंद्रभागेच्या तीरी उसळला जनसागर
  • जय हरी विठ्ठला’च्या जयघोषाने दुमदुमली पंढरी
पंढरपूर : चंद्रभागेच्या तिरी, उभा मंदिरी, तो पाहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जयहरी, असंच काहीसं चित्र सध्या पंढरपुरात पाहायला मिळालं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठ्ठलाची ओढ महाराष्ट्रातल्या प्रत्येक भाविकाला असते. त्यातच आपल्या लाडक्या विठुरायाचा सर्वात मोठा सोहळा म्हणजे माघी एकादशीचा सोहळा होय. याच दिवशी महाराष्ट्राच्या व इतर राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक पंढरीनगरीत विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल होतात. हाच माधीचा सोहळा पंढरपुरात उत्साहात साजरा झाला. माघी वारीसाठी तब्बल चार लाख भाविक दाखल झाले होते. अंगामध्ये पांढऱ्या कपड्यांचा पोशाख परिधान करत लहान थोर राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीनगरीत दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. सर्व भेदभाव विसरून जातीपाती संपवून एकमेकांच्या पाया पडत हरी नामाच्या गजर झाला.

Akola News : एसटी महामंडळाचे ‘एसटी संगे तीर्थटन’ उपक्रम! शिर्डीसह धार्मिकस्थळांसाठी पॅकेज

वारकऱ्यांच्या संख्येत यंदा झाली 25 ते 30 टक्के वाढ
यंदा माधीवर पावसाचे सावट नसल्याने मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी पंढरीनगरीत दाखल झाले होते. शहरात भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाला, मागील माधी वारीच्या तुलनेत यावर्षी 25 ते 30 टक्के वारकरी संख्या वाढलेली दिसत आहे. त्यामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. वारकरी संप्रदाय भागवत धर्माची पताका सदैव फडकवत ठेवत असून अशा वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी शासन सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे.

वारीनिमित्त स्थानिक उद्योगातून झाली कोट्यवधी रुपयाची उलाढाल
माधी वारीनिमित्त स्थानिक उद्योगाच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल झाली. स्थानिक व्यवसायामधील हळदीकुंकू, बुक्का विक्री, पेढा विक्री, अगरबत्ती यासह पंढरीतील प्रसिद्ध चुरमुरे, घोंगडी यासारख्या छोट्या-मोठ्या उद्योगांमधून शेकडो कोटींची उलाढाल माधी वारीच्या निमित्ताने पाहायला मिळाली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरीत दाखल होणारे भाविक मोठ्या भक्तीभावाने बुक्का, कुंकू यासह पंढरीच्या पेढ्याला मोठी पसंती देतात. या व्यवसायांमधील उलाढाल मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळाले.

एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी-मातेची नित्यपूजा
माधी एकादशीनिमित्त मंदिर समितीच्यावतीने श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची नित्यपूजा करण्यात आली. श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. शिवाजीराव मोरे, तर रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. यावेळी सदस्या शकुंतला नडगिरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, लेखाधिकारी मुकेश अनेचा व विभाग प्रमुख संजय कोकीळ उपस्थित होते.

Akola Municipal Corporation Election 2026 : अबब ! २४ हजारावर ‘नोटा’ला मतदान…, अकोल्यात कोण होणार नगरसेवक?

Web Title: Huge crowd of devotees in pandharpur during maghi yatra festival

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 12:41 PM

Topics:  

  • pandharpur
  • Vithhal Rukmini Temple

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.