Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wai News: पाचगणीत महाकाय वृक्ष उन्मळून मुख्य रस्त्यावर कोसळले; दोन वाहनांसह चहाची टपरी चक्काचूर, सुदैवाने जीवितहानी टळली!

पाचगणी-वाई मुख्य मार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डनसमोर मुसळधार पावसामुळे दोन महाकाय झाडे कार, दुचाकी आणि चहाच्या टपरीवर कोसळली. ३ जण थोडक्यात बचावले असून वाहतूक २ तास ठप्प होती.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 24, 2026 | 05:34 PM
पाचगणीत महाकाय वृक्ष उन्मळून मुख्य रस्त्यावर कोसळले

पाचगणीत महाकाय वृक्ष उन्मळून मुख्य रस्त्यावर कोसळले

Follow Us
Follow Us:
  • पाचगणीत महाकाय वृक्ष उन्मळून मुख्य रस्त्यावर कोसळले
  • दोन वाहनांसह चहाची टपरी चक्काचूर
  • सुदैवाने जीवितहानी टळली!
वाई : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पाचगणीत एक मोठी दुर्घटना घडली. पाचगणी-वाई मुख्य मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डनसमोर आज सकाळी एक महाकाय पिंप्रण वृक्ष अचानक रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या मोठ्या आंब्याच्या झाडावर कोसळला. या प्रचंड वजनामुळे दोन्ही झाडे मुळासकट मुख्य रस्त्यावर उन्मळून पडली. या दुर्घटनेत रस्त्यावरून जाणाऱ्या दोन गाड्या आणि एक चहाची टपरी झाडाखाली दाबले जाऊन मोठे नुकसान झाले. मात्र, ‘देव तारी त्याला कोण मारी’ या उक्तीनुसार तिघेजण या भीषण अपघातातून बाल-बाल बचावले असून केवळ नशीब बलवत्तर म्हणूनच मोठी जीवितहानी टळली.

काटवली (ता. जावळी) येथील नितीन बेलोशे हे आपल्या मालकीच्या मारुती सुझुकी वॅगनआर कारमधून (क्र. MH 11 BV 5925) पाचगणीहून वाईच्या दिशेने जात होते. ते गार्डनजवळ आले असता, समोरून अचानक महाकाय झाड कोसळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी अत्यंत चाणाक्षपणा दाखवत तातडीने गाडी थांबवून ती मागे घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याच क्षणात दुसऱ्या झाडाची अजस्त्र फांदी त्यांच्या गाडीवर कोसळली. यासोबतच विजेच्या ताराही गाडीवर तुटून पडल्याने कारमध्येच बेलोशे अडकून पडले. कारची काच फुटल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

याच कारच्या अगदी पाठीमागे धनंजय कासुर्डे हे आपल्या ॲक्सेस दुचाकीवरून (क्र. MH 11 CD 4089) चालले होते. त्यांच्याही दुचाकीवर झाडाची फांदी पडली, मात्र त्यांनी प्रसंगावधान राखून चालत्या गाडीवरून बाजूला उडी मारल्याने ते सुखरूप राहिले. याच ठिकाणी रस्त्याकडेला असणाऱ्या आंब्याच्या झाडाखाली विनोद गुलाबराव कासुर्डे-पाटील यांची चहाची टपरी होती. बाहेर काहीतरी अघटित घडत असल्याचा मोठा आवाज ऐकून ते तातडीने टपरीबाहेर धावले आणि त्याच क्षणात दोन्ही महाकाय झाडे त्यांच्या टपरीवर कोसळली. या दुर्घटनेत बेलोशे यांची चारचाकी, कासुर्डे यांची दुचाकी आणि चहाची टपरी यांचे मिळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

भोसे येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी भव्य आरोग्य, योग व जीवनशैली शिबिर संपन्न; १०० हून अधिक ज्येष्ठांची आरोग्य तपासणी!

घटनेची माहिती मिळताच पाचगणी नगरपालिकेची टीम, ‘एसओएस’ (SOS)चे सदस्य आणि महावितरणचे कर्मचारी यांनी पावसातच घटनास्थळाकडे धाव घेतली. कारमध्ये अडकलेल्या नितीन बेलोशे यांना कर्मचाऱ्यांनी शिताफीने बाहेर काढले. मुख्य रस्त्यावर झाडे पडल्यामुळे वाई-महाबळेश्वर मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी सुमारे दोन तास पूर्णपणे ठप्प झाली होती. पालिकेने तात्काळ महाबळेश्वर बाजू कडून येणारी वाहतूक न्यू इरा स्कूलमार्गे वळवून कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि सकाळच्या रिमझिम व धुक्यामुळे मदतकार्यात पालिका कर्मचाऱ्यांना सुरुवातीला मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागला. कटरच्या साहाय्याने झाडांच्या फांद्या तोडून रस्ता मोकळा करण्यात आला.

पाचगणी आणि महाबळेश्वर परिसरात पावसाळ्यात अशा दुर्घटना वारंवार घडत असून, याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना आणि पर्यटकांना बसत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच अशा धोकादायक आणि जीर्ण झालेल्या झाडांचे सर्वेक्षण करून पालिका व महसूल विभागाने ती वेळीच हटवणे गरजेचे आहे. मात्र, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने आतातरी जागे होऊन भविष्यातील मोठी दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी या घटनेनंतर जोर धरत आहे.

एल निनो पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सिआरए तंत्रज्ञान वापर करावा – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे

Web Title: Huge tree collapses on car and bike at panchgani wai highway three unhurt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 05:34 PM

Topics:  

  • Wai
  • Wai News

संबंधित बातम्या

भोसे येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी भव्य आरोग्य, योग व जीवनशैली शिबिर संपन्न; १०० हून अधिक ज्येष्ठांची आरोग्य तपासणी!
1

भोसे येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी भव्य आरोग्य, योग व जीवनशैली शिबिर संपन्न; १०० हून अधिक ज्येष्ठांची आरोग्य तपासणी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.