तसेच कृषी विभागामार्फत वाई तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी समाधानकारक असून तालुक्यातील कामकाज अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती मिळून आधुनिक व शाश्वत शेतीला चालना मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी तालुका कृषी अधिकारी हरीशचंद धुमाळ, मंडळ कृषी अधिकारी रवींद्र बेलदार, उप कृषी अधिकारी किरण बाबर निखिल मोरे, तसेच सहाय्यक कृषी अधिकारी सचिन जगताप व प्रविण नाळे प्रगतशील शेतकरी सुनील महांगडे तंटामुक्ती अध्यक्ष सदाशिव वरे राजश्री वरे शिवराज वरे उपस्थित होते.






