sanjay jadhav
मुंबई – मी काही आमदार संतोष बांगर नाही, जो एक म्हणेल आणि पलटी मारेल, मी मरेपर्यंत शिवसेनेसोबतच राहणार आहे असे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी सांगितले आहे. मी थोड्याच वेळात शिवाजी पार्कवर कार्यकर्त्यासह पोहचणार असून कायम शिवसेनेसोबत राहणार आहे. हे मी आधी देखील सांगितले आहे, असे सांगतानाच जे असे म्हटले असेल त्यांला माझया समोर आणा मग सांगतो असा इशाराही दिला आहे.
शिंदे गटाच्या दसऱ्या मेळाव्यात आज शिवसेनेचे आणखी २ खासदार आणि ५ आमदार प्रवेश करणार आहेत, असा दावा शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे. मात्र, हे आमदार, खासदार कोण? त्यांची नावे तुमाने यांनी जाहीर केली नाही. त्यामुळे आज शिंदे गटात शिवसेनेतून आणखी कोण-कोण प्रवेश करणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
परभणीचे खासदार असलेले अशोक देशमुख, सुरेश जाधव, तुकाराम रेंगे, गणेश दुधगावकर यांनी शिवसेनेशी पक्षद्रोह केला होता. मात्र यानंतर त्यांना शिवसैनिकांनी निवडून येऊ दिले नाही गेली ३० वर्षे या मतदारसंघात वर्ष भराचा अपवाद सोडता शिवसेनेचाच खासदार आहे. असे असताना खासदार जाधव पक्ष सोडणार नाहीच असे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.