Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवंदा लगीन करायचेच मला! मिलेट्रीवाला, मुंबईत सरकारी नोकरीला असलेला नवरा मुलगा पाहिजे

  • By Aparna
Updated On: May 03, 2023 | 06:23 PM
District administration succeeds in stopping child marriage of 17 year old child

District administration succeeds in stopping child marriage of 17 year old child

Follow Us
Close
Follow Us:

विजयकुमार कांबळे, चंदगड : सद्या लग्न सराईचे दिवस सुरु आहेत.मात्र यावर्षी लग्नाचे मुहूर्त कमी प्रमाणात असल्यामुळे वधूच्या (मुलींच्या ) शोधात मुलाकडील मंडळी आहेत. मुली शोधताना  सर्वांचीच धावपळ होत आहे. प्रत्येक जण आपल्या मुला-मुंलीचे  ‘अवंदा लगीन करायचेच’ म्हणून मुंलीच्या शोधात आहेत. अनेक गावा-गावात जाऊन पाव्हणं……गावात कुणाची मुलगी द्यायची हाय… काय……..?अशी विचारणा केली जात आहे. मुली हाईत खरं लयी शिकलेल्या हाईत. त्यांना मिलेट्रीवाला किंवा मुंबईत सरकारी नोकरीला असलेला नवरा मुलगा पाहिजेत. आणि तेथे स्वता:ची रुम पाहिजेत.अशी आई- बाबांची मोठी अपेक्षा हाय.पाव्हणं तुम्ही त्यांच्या घरी जाऊन विचारून बघा त्यांना. असाच सल्ला दिला जातो.

मुलीच्या घरी गेल्यानंतर मात्र आई -बाबांचा भाव भलताच वधारलेला दिसतोय. मुली बघताना मात्र आई-वडील, नातेवाईक,मित्र मंडळींची भलतीच तारांबळ होताना दिसते. मुलाला नवरी मिळेना, मुहूर्त मात्र सापडेना. अशी विचित्र अवस्था पहायला मिळते.मुला -मुलींच्या पत्रिका बघण्यासाठी भटजीच्या घराचा उंबरठा ओलांडून जाण्याची वेळ आई, वडील आणि नातेवाईकांच्यावर आली आहे.मात्र सुनबाई माझ्या घरचा उंबरठा कधी ओलांडून येणार? याचीच चिंता करत बसण्याची वेळ आई-बाबांच्यावरआली आहे.

अलीकडच्या काळात कोण कुणाला जुमानत नाहीत… म्हणूनच मुलींच्या पळून जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पुर्वीच्या काळी थोरा-मोठ्यांचा आदर होता.माणसं एकमेकांच्या शब्दाला मान-सन्मान देत असत. मनात आदराची भावना आणि तितकिच भिती ही होती. मात्र आज लहान मुले मुली सुद्धा कुणाचेही ऐकत नाहीत.त्यामुळे मुलं-मुली पळून जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.पाहुणे आणि नवरा मुलगा आला, त्यांनी तीला बघीतले,नावरस जुळून आले. सर्वच काही ठरल्याप्रमाणे गोष्टी केल्या.उपस्थित पाहुणे मंडळी नी यांचा मुलगा…. त्यांच्या मुलाला दिली. असे गावकरी पंचासमोर तसेच चारचौघात जाहिर करण्यात आले.आणि मुलीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात झाला. उपस्थित पाहुणे मंडळी नी मुलीसह आपलेही तोंड गोड केले.

लग्नाची तारीख, वेळ, विवाह स्थळ, आमचेही आग्रहाचे निमंत्रण. कै….यांची नातं, यांची..कन्या… मुलीचा मामा….काका अशी सगळ्यांच पै.पाहुणे, आमदार – खासदार आदीची नावे घालून महागडी लग्नं पत्रिका काढली. आमच्या ताईच्या,माईच्या, मावशीच्या लग्नाला यायचं ह…! अशी छोट्या निमंत्रक मंडळीनी विनंती केली. मात्र नवरी मुलगी लग्नाच्या आदल्याच दिवशी दुस-या मुलांबरोबर पळून गेल्याने सर्वांनाच मानखाली घालण्याची वेळ आली आहे.

अनेक गावांमध्ये मुलांची संख्या जास्त प्रमाणात दिसून येते.अनेक तरुण विविध कारणांमुळे आपले लग्न पुढच्या वर्षी करुयात असे म्हणत वय वाढत चालले. आणि आज ३० ते ३२  वर्षे झाली तरी जुळेना…..मग या तरूणाने करायचे तरी काय….? असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे.

तालुक्यात एजंटांचा सुळसुळाट
वधू आणि वरांच्या गरीब श्रीमंतीकडे बघून वधू-वर सुचक (एजंट ) मंडळी काम करत आहेत.मुलींचे फोटो दाखवितो,बायोडाटा आणि सर्व माहिती सांगतो खरं पहिल्यांदा एक हजार ते दोन हजार रुपये द्या. आणि लग्न ठरविल्यानंतर दहा हजार आणि त्यापुढे रक्कम द्यावी लागेल, असे बीन दख्खतपणे न भाड-भिडाठेवता एजंटा कडून मागणी केली जाते. त्यामुळे जशी माणसं तशी मागणी…असेच चित्र पहायला मिळत आहे. तालुक्यात मात्र अशा एजंटांचा सुळसुळाट वाढला असून मुलींच्या पेक्षा एंजटांचीच मनधरणी करण्याची वेळ मुला-मुलींच्या आई-बाबावर आली आहे.

लग्नाची तारीख, वेळ, विवाह स्थळ, आमचेही आग्रहाचे निमंत्रण. कै….यांची नातं, यांची..कन्या… मुलीचा मामा….काका अशी सगळ्यांच पै.पाहुणे, आमदार -खासदार आदीची नावे घालून महागडी लग्नं पत्रिका काढली. आमच्या ताईच्या, माईच्या, मावशीच्या लग्नाला यायचं ह…! अशी छोट्या निमंत्रक मंडळीनी विनंती केली. मात्र नवरी मुलगी लग्नाच्या आदल्याच दिवशी दुसऱ्या मुलांबरोबर पळून गेल्याने सर्वांनाच मानखाली घालण्याची वेळ आली आहे.

Web Title: I want to marry husband should have government job or from mumbai nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2023 | 06:23 PM

Topics:  

  • kolhapur
  • kolhapur news
  • maharashtra
  • marraige

संबंधित बातम्या

Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका
1

Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप
2

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी तृतीयपंथी निवडणूक रिंगणात; ‘शाहू आघाडी’कडून मिळाली उमेदवारी
3

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी तृतीयपंथी निवडणूक रिंगणात; ‘शाहू आघाडी’कडून मिळाली उमेदवारी

Kolhapur News : पाणीपुरवठा योजनेत भष्टाचार; उद्घाटनापूर्वीच पाण्याच्या टाकीचे तीनतेरा
4

Kolhapur News : पाणीपुरवठा योजनेत भष्टाचार; उद्घाटनापूर्वीच पाण्याच्या टाकीचे तीनतेरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.