
ST Bus Online Booking fraud in Amalner Bus Stand Jalgaon News
मुंबई : प्रवासासाठी सर्वसामान्यांचा कल हा एसटी बसकडेच असतो. त्यात एसटी बसमधून प्रवास करताना अनेक योजना आहेत त्यातून सवलतीच्या दरात प्रवास करणे आता शक्य झाले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेकडेही एसटीकडून वेळोवेळी उपाययोजना केल्या जात आहेत. असे असताना आता अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी एसटीने नवीन यंत्रणा आणली आहे.
मद्यपान करुन गाडी चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महामंडळाने ताफ्यात येणाऱ्या नव्या बसमध्ये ‘ब्रेथ अॅनालायझर’ यंत्रणा लावण्याचा निर्णय घेतला आहे. एखादा मद्यपी चालक स्टेअरिंग हाती घेताच इंजिन सुरू होणार नाही. त्यामुळे अशा चालकांवर महामंडळाला सहज करावाई करता येणार आहे. एसटीची वाहतूक ही सुरक्षित वाहतूक म्हणून ओळखली जाते.
दरम्यान, दिवसाला सुमारे ५० ते ५३ लाख नागरिक एसटीने प्रवास करतात. विविध सवलतीमुळे एसटीची प्रवासी संख्या वाढत आहे. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करण्याकरिता महामंडळातर्फे चालकांच्या समुपदेशनावर भर दिल जातो. प्रवाशांच्या जिवाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तसेच नशेत असलेल्या चालकांमुळे होणाऱ्या अपघातांचा धोका टाळण्यासाठी एसटीने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
8000 बसेसमध्ये असणार नवीन टेक्नॉलॉजी
एसटीच्या ताफ्यात येणाऱ्या आठ हजार नव्या बसमध्ये ‘ब्रेथ अॅनालायझर’ प्रणाली अनिवार्य केली आहे. महामंडळाने नव्या बस खरेदीसाठी तयार केलेल्या करारनाम्यातच ब्रेथ अॅनालायझर प्रणाली बसविणे बंधनकारक केले आहे. म्हणजेच, नव्या बस उत्पादक कंपनीनेच या यंत्राची बसवणी आणि तपासणी करून देणे आवश्यक आहे.
दारू पिऊन एसटी चालवणे थांबणार
‘ब्रेथ अॅनालायझर’ हे एक आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. चालकाने श्वास घेताच अल्कोहोलचे प्रमाण तपासून ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त प्रमाण आढळल्यास प्रणाली ‘लॉक’ होते. या नव्या यंत्रणेमुळे मद्यधुंद अवस्थेत बस चालविणाऱ्या चालकांना अटकाव बसणार आहे. महाधुंद चालकांमुळे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी ही यंत्रणा अत्यंत प्रभावी ठरेल.
गेल्या महिन्यात सात कर्मचारी निलंबित
२८ ऑक्टोबर रोजी राज्यभरातील सर्व विभागांमध्ये कर्मचाऱ्यांच्या मद्यपान तपासणीची एक मोठी आणि अचानक मोहीम राबविली होती. त्या कारवाईत संशयास्पद ७१९ चालक, ५२४ वाहक आणि ४५८ यांत्रिक अशा सुमारे १ हजार ७०१ कर्मचाऱ्यांची तपासणी केली. या कारवाईत दोषी आढळलेल्या कर्मचाऱ्यांवर दोषारोप निश्चित केले. त्यामध्ये १ चालक आणि ४ यांत्रिक कर्मचाऱ्यांसह एकूण ७ कर्मचारी निलंबित केले होते.
हेदेखील वाचा : Solar energy project On ST Bus : ST च्या मोकळ्या जागेवर होणार ‘सौर ऊर्जा प्रकल्प’; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा