Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tuljapur News: तुळजापूरमध्ये अवैध धंदे वाढले; नगराध्यक्षांचा पोलिसांना इशारा

आई तुळजाभवानीच्या पवित्र नगरीत अवैध धंद्यांचा वाढता फैलाव होत असल्याचा गंभीर आरोप करत नगराध्यक्ष विनोद विलासराव गंगणे यांनी पोलिस प्रशासनावर थेट निशाणा साधला आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 22, 2026 | 02:32 PM
Tuljapur News: तुळजापूरमध्ये अवैध धंदे वाढले; नगराध्यक्षांचा पोलिसांना इशारा (फोटो सौजन्य: social media)

Tuljapur News: तुळजापूरमध्ये अवैध धंदे वाढले; नगराध्यक्षांचा पोलिसांना इशारा (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • तुळजापूर शहरासह ग्रामीणमध्ये अवैध धंद्यांचा मोठा सुळसुळाट
  • नगराध्यक्षांचा पोलिसांना इशारा; कारवाईची मागणी
  • पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मारणार
Tuljapur News: आई तुळजाभवानीच्या पवित्र नगरीत अवैध धंद्यांचा वाढता फैलाव होत असल्याचा गंभीर आरोप करत नगराध्यक्ष विनोद विलासराव गंगणे यांनी पोलिस प्रशासनावर थेट निशाणा साधला आहे. शहरातील जुगार, मटका, चक्री तसेच देहविक्रीसारख्या प्रकारांवर तात्काळ बंदी घालावी, अन्यथा पुढील आठवड्‌यात पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. यासंदर्भात पोलिस निरीक्षकांना देण्यात आलेल्या निवेदनात तुळजापूर हे राज्याचे प्रमुख श्रद्धास्थान असल्याने येथे येणाऱ्या लाखो भाविकांपुढे शहराची प्रतिमा मलिन होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. आता पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

हे देखील वाचा: Latur News: लातूरमध्ये ग्रामपंचायत पोटनिवडणुकांचा बिगुल वाजला! 10 सरपंच आणि 58 सदस्यपदांसाठी 28 एप्रिलला मतदान

अवैध शस्त्रप्रकरणाची त्वरित चौकशी करा. तुळजापूर शहरात अवैध गावठी पिस्तूल प्रकरणातही सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांत दोन ठिकाणी फायरिंगच्या घटना घडल्या असून आठवडा बाजार परिसरात गावठी बंदुकीसह आरोपी पोलिसांच्या ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे. अवैध धंद्यांच्या सूत्रधारांवर कारवाई करा अशी मागणी होताना दिसून येत आहे. मटका, तिरट जुगार, चक्री, गुटखा, अवैध दारू, गांजा तसेच देहविक्रीचे प्रकार खुलेआम सुरू असून पोलिसांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

हे देखील वाचा: भोंदूबाबा अशोक खरातवर उद्धव ठाकरेंकडून लाभाची खैरात; शेतकऱ्यांसाठीचे पाणी ‘शिवनिका’ संस्थेकडे वळवले

केवळ किरकोळ व्यक्तींवर कारवाई न करता या अवैध धंद्यांच्या सूत्रधारांवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर औदुंबर कदम, किशोर साठे, नरेश अमृतराव, माऊली भोसले, सादर कदम, रत्नदीप भोसले, लखन पेंदे, दिनेश शिरसागर, पंडित जगदाळे, अजित परमेश्वर, आनंद सावंत, विजय कंदले, विशाल रोजकरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनाही पाठविण्यात आली आहे. भाविकांच्या मनातील शहराची प्रतिमा धोक्यात असल्याचे स्थानिक नागरिकांनी भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे तुळजापूर अवैध धंद्यांविरोधात आंदोलनाची तयारी करणार असल्याचे सांगितले जात आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Illegal activities on the rise in tuljapur council president warns police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Dharashiv Crime
  • tulajapur

संबंधित बातम्या

Dharashiv News: जनहिताच्या डीपीसी निधीतून सामाजिक न्यायाला हरताळ : उच्चस्तरीय चौकशीची मागणी
1

Dharashiv News: जनहिताच्या डीपीसी निधीतून सामाजिक न्यायाला हरताळ : उच्चस्तरीय चौकशीची मागणी

“शालेय विद्यार्थ्यांच्या घासात पाप”, आमदार कैलास पाटलांचा गंभीर आरोप; पोषण आहारातील भ्रष्टाचाराविरुद्ध विधानसभेत हल्लाबोल
2

“शालेय विद्यार्थ्यांच्या घासात पाप”, आमदार कैलास पाटलांचा गंभीर आरोप; पोषण आहारातील भ्रष्टाचाराविरुद्ध विधानसभेत हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.