Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Doctors Strike Suspended : IMA चा महत्त्वाचा निर्णय, डॉक्टरांचा सोमवारचा संप तात्पुरता स्थगित

Doctors Strike Suspended : डोंबिवलीतील शासत्रीनगर परिसरात काही दिवसांपुर्वी डॉक्टर आणि परिचारिकांवर हल्ला होण्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणात डॉक्टर सृष्टी बाविस्कर ही जखमी झाली, याचपार्श्वभूमीवर डॉक्टर संघानेने संप करण्याचे पुकारले होते, परंतू सोमवारी म्हणजेच उद्या हा संप स्थगित होणार आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 19, 2026 | 03:32 PM
Doctors Strike Suspended (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Doctors Strike Suspended (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

डोंबिवली डॉक्टर आणि परिचारिकांवर हल्ला प्रकरण

महाराष्ट्र शाखेने 27 तास राज्यव्यापी सेवा बंद ठेवण्याचा इशारा

सोमवारी रुग्णालयांतील नियमित वैद्यकीय सेवा सुरु राहणार

सध्या संप स्थगित

 

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकांवर झालेल्या हल्ल्यामुळे राज्यभरातील वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली होती.या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन आयएमए महाराष्ट्र शाखेने 27 तास राज्यव्यापी सेवा बंद ठेवण्याचा इशारा दिला होता. मात्र अखेर रुग्णांचे होणारे हाल लक्षात घेऊन आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या विनंतीचा आदर करत हा बंद सध्या स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Navi Mumbai News: मुंबई एपीएमसी वर्तुळात उडाली एकच खळबळ! १५०० व्यापाऱ्यांना वसुलीच्या नोटिसा

या निर्णयामुळे सोमवारी रुग्णालयांतील नियमित वैद्यकीय सेवा सुरु राहणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषत: ओपीडी सेवा बंद राहण्याची शक्यता असल्याने अनेक रुग्ण चिंतेत होते.मात्र आता उपचारासाठी येणार्‍या रुग्णांना पूर्वीप्नमाणे सेवा मिळणार आहे.

कठोर कायदेशीर पावले उचलण्याची गरज..

आयएमने स्पष्ट केले की, ही लढाई केवळ एका रुग्णालयापुरती मर्यादित नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणार्‍या हिसांचाराला आळा बसावा आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी कठोर कायदेशीर पावले उचलण्याची गरज आहे. डॉक्टरांवर हात उगारणाऱ्यांवर जलगतीने खटले चालवून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही संघटनेकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करत रुग्णांच्या हिताचा विचार करण्याचे आवाहन केले. न्यायालयाने सांगितले की, आंदोलनाचा अधिकार सर्वांना आहे, मात्रा त्याचा फटका उपचारासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना बसू नये. यानतंर आयएमएने भूमिका घेत संप तात्पुरकता मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला.

डॉक्टर सृष्टी बाविस्कर यांच्या वडीलांनीही न्यायालयाची भूमिका *(Doctors Strike Suspended)

या प्रकरणात जखमी झालेल्या डॉक्टर सृष्टी बाविस्कर यांच्या वडीलांनीही न्यायालयाच्या भूमिकेचे स्वागत आहे. त्यांनी सांगितले की, देशात कायद्याचे राज्य कायम होते. यावर हा निर्णय शिक्कामोर्तब करतो. डॉक्टरांच्या भीतीच्या वातावरण तयार झाले होते.अशी त्यांची अपेक्षा आहे.

अनेक डॉक्टरांमध्ये नाराजी

Mumbai Local Train Update : 7 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मोठा दिलासा! अंबरनाथ, बदलापूर, कर्जत प्रवाशांसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

आरोपीला मिळालेल्या जामिनामुळे अनेक डॉक्टरांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात अस्वस्थतेचे वातावरण तयार झाले होते. मात्र न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने कायद्यावर विश्वास ठेवणे गरजेचे असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले.

आरोग्य सेवा ही समाजासाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळे डॉक्टरांचे संरक्षण आणि रुग्णांचे हित या दोन्ही गोष्टी समान महत्त्वाच्या आहेत. डॉक्टर सुरक्षित असतील तरच ते मनापासून सेवा देऊ शकतील, हे वास्तव नाकारता येणार नाही.

सध्या संप स्थगित झाला असला तरी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न कायम आहे. सरकार, प्रशासन आणि वैद्यकीय संघटना यांनी एकत्र येऊन कायमस्वरूपी उपाययोजना केल्यास अशा घटना टाळता येऊ शकतात. या घटनेनंतर आरोग्य व्यवस्थेतील सुरक्षेवर अधिक गंभीरपणे विचार करण्याची गरज असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

 

Web Title: Ima temporarily calls off mondays doctors strike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • Doctors Strike
  • Medical Hospital

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.