
Cold Wave Alert: स्वेटर, जर्किन घालूनच फिरा! महाराष्ट्रावर मोठे संकट येणार! येत्या २४ तासांमध्ये...
राज्यात थंडीचा कडाका वाढला
अनेक जिल्ह्यात तापमानात झाली घट
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात घट
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानात घट झाल्याचे दिसून येत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. मात्र उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडीची लाट येण्याचा अंदाज देण्यात आला आहे. उत्तरेकडे प्रचंड थंडी पडली असून, राज्यात थंड वारे येत आहेत. पुढील काही दवसांमध्ये थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज आहे.
गेले काही दिवस राज्यातील अनेक भागात पहाटे आणि रात्रीच्या वेळेस गार वारे वाहत आहेत. पहाटेच्या वेळेस दाट धुके पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवसांमध्ये राज्यात थंडीची लाट येण्याची अंदाज हवामान विभागाने वर्तवली आहे. या महिन्यात थंडी कमी अधिक प्रमाणात राहू शकते.
येत्या काही दिवसांत राज्यात थंडीचा कडाका वाढणार आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तरखंड, हरियाणा आणि उत्तरेकडील राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरला आहे. पुणे, नाशिक, जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. हवामान विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Pune Weather: पुण्याचं झालं काश्मीर! शहरात कडाक्याची थंडी; सर्वात नीचांकी तापमानाची नोंद
पुण्यात तापमानात आणखी घट