Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: दारं, खिडक्या बंद करा! पुढील 6 दिवस धोक्याचे; कोकण अन् गोव्यात…

ठाणे, मुंबई, रायगड, पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 23, 2026 | 08:44 PM
Maharashtra Rain Alert: दारं, खिडक्या बंद करा! पुढील 6 दिवस धोक्याचे; कोकण अन् गोव्यात…
Follow Us
Follow Us:

महाराष्ट्रातील मान्सूनची वाटचाल वेगाने सुरू
दोन ते तीन दिवसांत राज्याच्या उर्वरित भागात दाखल होणार
कोकण-गोव्यात तुरळक पावसाचा अंदाज

सुनयना सोनवणे / पुणे:  नैऋत्य मान्सूनने महाराष्ट्रातील वाटचाल वेगाने सुरू ठेवत मंगळवारी (ता.२३) उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील आणखी काही भाग व्यापले. भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) माहितीनुसार, मान्सूनने डहाणू, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि वर्ध्यापर्यंत प्रगती केली असून पुढील दोन ते तीन दिवसांत राज्याच्या उर्वरित भागातही त्याची आगेकूच होण्याची शक्यता आहे.

आजपासून पुढील सहा दिवस कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. बुधवारी (ता. २४) रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याने तेथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ठाणे, मुंबई, रायगड, पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथा भागांसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम तसेच २४ जूनपासून गोंदिया, गडचिरोली, अमरावती, बुलढाणा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांत पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याने तेथे ‘उष्णतेसाठी यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

पुणे शहर आणि परिसरात पुढील सात दिवस दुपारनंतर किंवा सायंकाळी मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मंगळवारी शहराचे कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. शहरातील काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. बुधवारी कमाल तापमान ३० अंश आणि किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज असून गुरुवारनंतर किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Web Title: Imd alert to goa konkan and orange alert to heavy rain in maharashtra latest weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 08:37 PM

Topics:  

  • IMD alert of maharashtra
  • Monsoon Alert
  • Weather Update

संबंधित बातम्या

Rain Update : पावसाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट; 18 ऑगस्टपर्यंत राहणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट जारी
1

Rain Update : पावसाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट; 18 ऑगस्टपर्यंत राहणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Rain Update : देशातील 19 राज्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळाचा इशारा; महाराष्ट्रासह राजधानी दिल्लीत…
2

Rain Update : देशातील 19 राज्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळाचा इशारा; महाराष्ट्रासह राजधानी दिल्लीत…

देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा कहर; आसाममधील पुरात आत्तापर्यंत 99 जणांचा मृत्यू
3

देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा कहर; आसाममधील पुरात आत्तापर्यंत 99 जणांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.