मुंबई: यंदा मान्सून वेळेआधीच दाखल झाला आहे. मात्र सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची घाई न करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मात्र आता हवामान विभागाने राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा दिला आहे. पुढील चार दिवस राज्यात कसे वातावरण असेल त्याबद्दल जाणून घेऊयात.
आज मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. येत्या चार दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याचा इशारा दिला आहे. कोणत्या जिल्ह्यात कसे वातावरण असेल ते पाहुयात.
वेळेआधीच मान्सून राज्यात दाखल झाल्याने सुरुवातीच्या काही दिवसांत राज्याला पावसाने झोडपून काढले होते. काही ठिकाणी टर पावसाने जोरदार बॅटिंग केल्याचे पाहायला मिळाले. मात्र त्यानंतर अनेक दिवस पावसाने उसंत घेतली आहे. आता पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. राज्याच्या तापमानात घट होण्याचा अंदाज आहे.
आयएमडीने दिलेल्या इशाऱ्यानुसार, राज्यात 12 जूनपासून मान्सून सक्रिय होणार आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. राज्यात पावसाळा पोशाक असे वातावरण तयार झाल्याचे दिसून येत आहे. गेले काही दिवस उकाड्यात वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, सातारा या भागात हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पाडण्याचे आवाहन सरकार आणि हवामान विभागाने केले आहे. विदर्भ, मराठवाडा भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा
पुण्याच्या ग्रामीण भागात, विशेषतः चाकण आणि परिसरात, चार दिवसांच्या उसंतीनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. दुसरीकडे, पुण्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. आता शहरातील विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. त्यामुळे १४ ते १५ जूनपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. तर हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील काही भागात तापमान हे ४५ अंशाच्या पुढे जाऊ शकते. मुंबई, पुणे ,कोकण आणि राज्यातील काही भागात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान शेतकरी पेरणी करण्याचा विचार करत असतील तर, काही दिवस थांबावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.