Maharashtra Rain News: आता सुट्टी नाही! कोकणासह ‘या’ जिल्ह्यांना पाऊस अक्षरशः….; IMD च्या अलर्टने वाढली चिंता
महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
कोकणासह पुण्यात कोसळधार
आयएमडीने दिला पावसाचा इशारा
IMD Heavy Rain Alert: राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र आता भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण,विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. दरम्यान महाराष्ट्रात देखील हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
आज कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. घाटमाथा, पुणे, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील पावसाचा जोर वाढणार आहे. मराठवाड्यातील काही भागात पावसाचा यलो अलर्ट दिला गेला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. पुणे, ठाणे, रायगड, घाटमाथा भागात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अंदाज आहे.
यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक पाऊस झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोकणाला तर पावसाने अक्षरशः झोडपून काढल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने राज्यातील बरीचशी धरणे देखील पूर्ण क्षमतेने भरली आहेत. दरम्यान आज देखील राज्यभरात पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात पावसासाठी अनुकूल हवामान तयार झाले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्टा निर्माण झाल्याने हे वातावरण तयार झाले आहे. कोकण किनारपट्टीवर पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, चंद्रपूर व गोंदियात जिल्ह्यात पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
मुसळधार पावसासह राज्यभरात वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राज्यभरात जोरदार पाऊस होऊ शकतो. पुणे, सातारा, घाटमाथा ani कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे थोडीशी विश्रांती घेतलेला पाऊस राज्यात पुन्हा एकदा सक्रिय होताना पाहायला मिळणार आहे.