Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Monsoon Alert: राज्याला पुढील २४ तास अत्यंत धोक्याचे; ‘या’ जिल्ह्यांत वरूणराजा कहर करणार, वाचाच…

सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने पाटण तालुक्यातील पूल वाहून गेला आहे. त्यामुळे चिपळूण कराड वाहतूक ठप्प झाली आहे. पुण्याकडे जाण्यासाठी भोर आणि ताम्हिणी घाटाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 17, 2025 | 03:30 PM
Maharashtra Monsoon Alert: राज्याला पुढील २४ तास अत्यंत धोक्याचे; ‘या’ जिल्ह्यांत वरूणराजा कहर करणार, वाचाच…
Follow Us
Follow Us:

पुणे: गेले दोन ते तीन दिवस राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यातच आता पुढील २४ तास राज्यासाठी चिंतेचे असल्याचे सांगितले जात आहे. अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आज अनेक भागात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. तरी काही जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. त्यातच आता हवामान विभागाने पुढील २४ तास मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. पुढील २४ तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यात अती ते अती मुसळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अंध वर्तवण्यात आला आहे.

कोकणात मुसळधार

कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर वाहत आहे. सह्याद्री पर्वत रांगेत मुसळधार पाऊस सुरू असल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने पाटण तालुक्यातील पूल वाहून गेला आहे. त्यामुळे चिपळूण कराड वाहतूक ठप्प झाली आहे. पुण्याकडे जाण्यासाठी भोर आणि ताम्हिणी घाटाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर कोल्हापूरला जाण्यासाठी रत्नागिरी आणि देवरुख या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान पातळ तालुक्यात वाहून गेलेला पूल दुरुस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

Monsoon Update: मान्सूनच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाचे शेतकऱ्यांना मोठे आवाहन, “पेरणी आणि लागवड…”

राज्यात मागील २४ तासांमध्ये (१७ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) मुंबई उपनगर जिल्ह्यात ८३.४ मिमी पाऊस झाला आहे. तर ठाणे जिल्ह्यात ७३.७ मिमी, मुंबई शहर ६२.९ मिमी, रायगड ५४.१ मिमी आणि पालघर जिल्ह्यात ४९.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज १७ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे ७३.७, रायगड ५४.१, रत्नागिरी ४७.७, सिंधुदुर्ग १२.७, पालघर ४९.७, नाशिक ७.७, धुळे ७.१, नंदुरबार ४, जळगाव ६.७, अहिल्यानगर १.१, पुणे ११.९, सोलापूर ०.९, सातारा १९.७, सांगली ६, कोल्हापूर १७.८, छत्रपती संभाजीनगर ०.६, जालना ०.१, बीड ०.७, लातूर ०.१, धाराशिव १.६, नांदेड ३.६, परभणी १.७, हिंगोली ३.६, बुलढाणा ३.५, अकोला ८.७, वाशिम ८.५, अमरावती ९.४, यवतमाळ ८.७, वर्धा ७.६, नागपूर ०.९, गोंदिया ०.२, चंद्रपूर ११.९ आणि गडचिरोली जिल्ह्यात ५.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर आहे. जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना सतर्क राहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी येथे मुंबई- गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील वळंजवडी येथे महामार्गावर १०० मीटर परिसरात भेगा पडल्याने या महामार्गावरील वाहतूक एकेरी मार्गावरून सुरू आहे.

सातारा जिल्ह्यातील पाटण-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीसाठी केलेला पर्यायी रस्ता पाण्याखाली जाऊन खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. दुचाकी व चार चाकी वाहतूक नेरळे- माणगाव- मणेरी- चाफेर-संगमनगर धक्का मार्गे कोयनानगर अशी वळवण्यात आली आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्ती आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर झाड पडून तीन व्यक्ती जखमी, स्लॅब पडून दोन व्यक्ती जखमी आणि भिंत पडून दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तसेच यवतमाळ जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्तीचा मृत्यू झाला असून धुळे जिल्ह्यात भिंत पडून चार प्राण्यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे.

Web Title: Imd gave heavy rain alert to maharashtra orange alert to kokan western ghats weather update marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 03:27 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • IMD alert of maharashtra
  • Maharashtra Weather

संबंधित बातम्या

ऑक्टोबर सुरु होताच अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पूर्व भारतातील भागांत गारपीटीचीही शक्यता
1

ऑक्टोबर सुरु होताच अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पूर्व भारतातील भागांत गारपीटीचीही शक्यता

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत
2

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.