मुंबई: राज्यात पुढील २४ तासासाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य आपत्कानील कार्य केंद्राने कळविले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस सुरु आहे. रायगड जिल्ह्यातील नद्या देखील दुथडी भरून वाहत आहेत. सावित्री नदी देखील दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.
कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा
भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रामार्फत ठाणे, मुंबई शहर व उपनगर, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या किनारपट्टीला दि. २४ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५.३० पासून ते दि. २६ जुलै २०२५ रोजीचे रात्रौ ८.३० पर्यंत ३.८ ते ४.७ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच समुद्राची धूप आणि उंच लाटांचे तडाखे समुद्र किनारी येण्याचा इशारा देण्यात आला असून सर्व जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबई शहर आणि उपनगर यांना पाणी पुरवठा करणाऱ्या मोडक सागर, मध्य वैतरणा आणि तानसा या धरणातून अनुक्रमे २०४३.७४, २११८.९५ आणि ३३१५.२५ क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचेही राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे. चिपळूण, खेड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणजेच जवळपास कोकण परदेशात पावसाचा जोर वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे तसेच समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे.
Konkan Rain Alert: सावधान! पुढील काही तास कोकणाला रेड अलर्ट; अति ते अति मुसळधार पाऊस कोसळणार
चिपळूण, खेड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणजेच जवळपास कोकण परदेशात पावसाचा जोर वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे तसेच समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे. सातारा जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. कोयनेच्या शिवसागर जलाशय क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग देखील सुरु करण्यात आला आहे. चिपळूण, संगमेश्वर, देवरुख, खेड या रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. पुढील २४ तासांमध्ये समुद्राला मोठे उधाण येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मच्छिमार बांधव आणि अन्य नागरिकांनी समुद्रात जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.