राज्याला जोरदार पावसाचा इशारा (फोटो - ani)
मुंबई: राज्यात गेले काही दिवस पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई, ठाणे आणि कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. मुंबई आणि उपनगरात पाऊस दरम्यान हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्यात कशाप्रकारच्या पावसाचा अंदाज दिला आहे, याबाबत जाणून घेऊयात.
मुंबई, ठाणे आणि पालघरसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारादेखील देण्यात आला आहे. जालना आणि बुलढाणा जिल्ह्यात अनके दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली आहे. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे.
जालना जिल्ह्यात काळ जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाण ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने शेतात पाणी साचले आहे. वाशीम जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस सुरु आहे. रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, कोयना धरण परिसर या भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. चिपळूण कराड मार्गाला जोडणारा कुंभार्ली घाट मार्ग देखील एका ठिकाणी खचला असल्याचे समोर येत आहे. दाट धुक्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे.
चिपळूण, खेड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणजेच जवळपास कोकण परदेशात पावसाचा जोर वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे तसेच समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे.
चिपळूण, खेड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणजेच जवळपास कोकण परदेशात पावसाचा जोर वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे तसेच समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे. सातारा जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. कोयनेच्या शिवसागर जलाशय क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग देखील सुरु करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. सांगली, सातारा आणि कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात देखील पावसाची संततधार सुरु आहे. पुण्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. आज कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी खूप मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गडगडाटासह वादळ व ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पावसाचा स्वरूप हलका ते मध्यम राहील.
मध्य महाराष्ट्रात आज काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल तर काही भागांत जोरदार पावसासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. उद्याही अशाचप्रकारे हवामान राहणार आहे.