Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कराड उत्तरमधील नागरिकांच्या प्रश्नांना त्वरित न्याय : आमदार मनोजदादा घोरपडे

या मतदारसंघातील कराड-रहिमतपूर प्रमुख रस्त्यासाठी 286 कोटी रुपये निधीची मंजुरी मिळाली आहे. या मतदारसंघातील पानंद रस्त्यासाठी साडेसात कोटी रुपये निधी मंजूर झाला असून, येत्या दीड वर्षात मतदारसंघातील सर्व पाणंद रस्त्याचे मुरमीमीकरण पूर्ण करू.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 01, 2026 | 08:30 AM
कराड उत्तरमधील नागरिकांच्या प्रश्नांना त्वरित न्याय - आमदार मनोजदादा घोरपडे

कराड उत्तरमधील नागरिकांच्या प्रश्नांना त्वरित न्याय - आमदार मनोजदादा घोरपडे

Follow Us
Follow Us:

मसूर : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे महसूल विषयक प्रश्न एकाच ठिकाणी मार्गी लावण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांना त्वरित न्याय मिळाला आहे, असे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी म्हटले आहे.

मसूर (ता.कराड) येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती याचे औचित्य साधून आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यापूर्वीही दीड वर्षात कराड उत्तर मतदारसंघात सुमारे 21 जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांचे प्रलंबित प्रश्न मार्गस्थ केले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार, उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, कराडच्या सभापती नंदा यादव, उपसभापती अनिता वेताळ, जिल्हा परिषद सदस्य लालासाहेब जगदाळे, पंचायत समिती सदस्य डॉ. संतोष पाटील, कोमल यादव, धैर्यजा माने, संग्राम पवार, प्रदीप साळुंखे, संपतराव इंगवले, बाजार समिती सभापती संतोष इंगवले आदी उपस्थित होते.

शेतकरी कर्जमुक्ती योजना; शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण करा,जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे निर्देश

आमदार घोरपडे म्हणाले, या मतदारसंघातील कराड-रहिमतपूर प्रमुख रस्त्यासाठी 286 कोटी रुपये निधीची मंजुरी मिळाली आहे. या मतदारसंघातील पानंद रस्त्यासाठी साडेसात कोटी रुपये निधी मंजूर झाला असून, येत्या दीड वर्षात मतदारसंघातील सर्व पाणंद रस्त्याचे मुरमीमीकरण पूर्ण करू. यापुढे कराड उत्तरचा सर्वांगीण विकास हे ध्येय व शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे.

यावेळी लालासाहेब जगदाळे, नंदा यादव, डॉ. संतोष पाटील यांनीही मार्गदर्शन केले. प्रांत अतुल म्हेत्रे यांनी प्रास्ताविक केले. दिपाली बामणे व बाजीराव पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तहसीलदार कल्पना ढवळे यांनी आभार मानले.

सर्वसामान्यांना विनाकारण हेलपाटे नकोत

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एका दिवसात होणारे काम तातडीने करावे. सामान्य माणसाला तलाठी, तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागू नयेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून गतिमान व लोकाभिमुख प्रशासन करावे. प्रशासकीय कामात अडथळा आणणारांना पाठीशी न घालता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी म्हटले आहे.

शासकीय योजनांचा लाभ मिळणार

शासन आपल्या दारी, सेवा थेट घरी या संकल्पनेला मूर्त रूप देणारे हे शिबिर सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असून नावातच समाधान आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी, समस्या सोडवत त्यांना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. लोककल्याणकारी शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध राहील.

– विठ्ठल इनामदार, अप्पर जिल्हाधिकारी

Web Title: Immediate redressal of issues faced by citizens of karad north says mla manojdada ghorpade

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • Government Work
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन
1

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य
2

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर
3

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर

BJP Satara : साताऱ्यात २,०२५ दिव्यांच्या रोषणाईत भाजपच्या ‘Sewa Sankalp Abhiyan’चा प्रारंभ!
4

BJP Satara : साताऱ्यात २,०२५ दिव्यांच्या रोषणाईत भाजपच्या ‘Sewa Sankalp Abhiyan’चा प्रारंभ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.