
Satara BJP News, Sewa Sankalp Abhiyan
Satara BJP Sewa Sankalp Abhiyan: ‘सेवा आणि विकासा’चा संदेश देत सातारा शहरात भारतीय जनता पक्षाच्या ‘सेवा संकल्प अभियाना’चा प्रारंभ करण्यात आला. पोवई नाका येथील शिवतीर्थ तसेच अटल बिहारी वाजपेयी पथावर गुरुवारी सायंकाळी दीपप्रज्वलन करून या अभियानाची सुरुवात झाली. सुमारे २,०२५ दिव्यांनी उजळलेल्या परिसराने अभियानाला वेगळेच स्वरूप प्राप्त झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६व्या वर्षातील पदार्पणानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. या महिनाभरात सामाजिक बांधिलकी, जनजागृती आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे.
Maharashtra Board Exams 2027: 10वी – 12वी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी सुरू होणार परीक्षा
भाजपचे गटनेते अविनाश कदम यांनी अभियानाची माहिती देताना सांगितले की, दीपप्रज्वलनाच्या माध्यमातून सेवा, विकास आणि जनकल्याणाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. अभियानाच्या कालावधीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अस्मिता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित केल्याचे सांगितले. त्यांच्या उत्तम आरोग्यासह दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त करत जनसेवेचा संकल्प या अभियानातून करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
चित्रकला स्पर्धा, पर्यावरणविषयक संदेश स्पर्धा, केंद्र शासनाच्या योजनांचा प्रचार-प्रसार, योजनांच्या लाभार्थ्यांच्या मुलाखती तसेच पात्र नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सेवा केंद्रांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. त्यामुळे केवळ उत्सवापुरते मर्यादित न राहता अभियानाला सेवाभिमुख स्वरूप देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
Sharad Pawar Letter To CM Fadnavis: शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार अन्… ; शरद पवारांच्या
दरम्यान, साताराशहरात नगरपालिका पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांच्या सहभागातून पोवई नाका ते वाडे फाटा या मार्गावरही दीपप्रज्वलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागांतही या अभियानांतर्गत कार्यक्रम सुरू करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.