Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन

Satara News : कोरेगावच्या उत्तर भागात प्रमुख नगदी पीक असलेल्या वाघ्या घेवड्याचा खरीप पीकविमा योजनेत समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

  • By विवेक
Updated On: Sep 19, 2026 | 10:22 PM
वाठार स्टेशन येथे घेवडा पिकाची पाहणी करताना जिल्हाधिकारी संतोष पाटील व परिसरातील शेतकरी.

वाठार स्टेशन येथे घेवडा पिकाची पाहणी करताना जिल्हाधिकारी संतोष पाटील व परिसरातील शेतकरी.

Follow Us
Follow Us:

Satara News : वाठार स्टेशन, कोरेगावच्या उत्तर भागात प्रमुख नगदी पीक असलेल्या वाघ्या घेवड्याचा खरीप पीकविमा योजनेत समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

वाठार स्टेशन येथे खरीप पिकाची सातबारा मध्ये नोंद करणे तसेच पीक पाहणीसाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील तसेच कोरेगाव चे प्रांत प्रमोद कुदळे, तहसीलदार संगमेश कोडे आले होते, यावेळी भागातील शेतकऱ्यांनी वाघ्या घेवडा पिकाचा पीकविमा भरता येत नसल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. दरम्यान जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घेवडा पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली.

जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले,“घेवडा हे पीक पालेभाजी वर्गात समाविष्ट असल्यामुळे सध्याच्या खरीप पीकविमा योजनेमध्ये त्याचा समावेश नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना घेवडा पिकाचा पीकविमा भरता आलेला नाही. मात्र या भागातील घेवडा हे प्रमुख पीक असल्यामुळे त्याचा खरीप पिकांमध्ये समावेश करण्यासाठी आमच्या कार्यालयामार्फत शासनाला आणि संबंधित विमा कंपनीला सुधारणा करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येईल.”

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य

“वाघ्या घेवड्याचा खरीप पिकांमध्ये समावेश करण्यासाठी शासनाकडे विनंती करून त्याचा पीकविमा योजनेत समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. खरीप पिकांमध्ये वाघ्या घेवड्याचा समावेश झाला, तर त्यानंतर पीकविमा योजनेतही या पिकाचा समावेश करता येईल,” असे जिल्हाधिकारी पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, खरीप पिकांची सातबारा नोंदणी अचूक व वेळेत करण्याच्या सूचना महसूल यंत्रणेला देण्यात आल्या असून, ई-पीक पाहणीतील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठीही आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.

पुढे जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले शेतकऱ्यांच्या खरीप पिकांची सातबारा उताऱ्यावर नोंदणी होणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने ॲप विकसित केले असून, ज्या शेतामध्ये जे पीक असेल, त्याची प्रत्यक्ष शेतात जाऊन नोंदणी करण्याची गरज आहे.”

ई-पीक पाहणीसाठी मंडलाधिकारी, तलाठी आणि महसूल सहाय्यक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल यंत्रणा हे काम करीत असली तरी प्रत्यक्ष नोंदणी करताना काही तांत्रिक अडचणी येत आहेत. या अडचणी समजून घेण्यासाठी तसेच पीक पाहणीची प्रत्यक्ष वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आपण शेतकऱ्यांच्या बांधावर आलो असल्याचे जिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले.

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर

यावेळी तलाठी सचिन माळी, महसूल सेवक मोहसीन पठाण, हणमंत तावरे,कोरेगाव तालुका शिवसेना उपप्रमुख चंद्रकांत काका पवार, कमलाकर भोईटे, विकास मतकर,सुरेंद्र लोंढे, कालिदास काळोखे,चेतन लोंढे,राजेंद्र लोंढे, सतीश जाधव,संतोष जाधव, सचिन जाधव, दत्तात्रय अहिरेकर आदी शेतकरी उपस्थित होते

जिल्हाधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घेवडा पिकाची पाहणी केल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून, वाघ्या घेवड्याचा खरीप पिकांमध्ये व त्यानंतर पीकविमा योजनेत समावेश करण्यासाठी शासनाकडे होणाऱ्या पाठपुराव्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Satara news district magistrate santosh patil statement on pikvima

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 10:22 PM

Topics:  

  • Farmer Issue
  • Satara News

संबंधित बातम्या

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य
1

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर
2

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर

BJP Satara : साताऱ्यात २,०२५ दिव्यांच्या रोषणाईत भाजपच्या ‘Sewa Sankalp Abhiyan’चा प्रारंभ!
3

BJP Satara : साताऱ्यात २,०२५ दिव्यांच्या रोषणाईत भाजपच्या ‘Sewa Sankalp Abhiyan’चा प्रारंभ!

Satara ZP Education Officer: सातारा जिल्हा परिषदेत खळबळ! शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे राज्य शासनाकडून निलंबित
4

Satara ZP Education Officer: सातारा जिल्हा परिषदेत खळबळ! शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे राज्य शासनाकडून निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.