Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarane Morcha: मनोज जरांगेंच्या मोर्चापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश; 40 अटींसह परवानगी

मसाजोग गावातूनही मोठा पाठिंबा मिळत आहे. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आंतरवाली सराटीकडे रवाना झाल्याचे सांगितले आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 27, 2025 | 09:44 AM
Manoj Jarane Morcha: मनोज जरांगेंच्या मोर्चापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश; 40 अटींसह परवानगी
Follow Us
Close
Follow Us:
  • मनोज जरांगेचा मोर्चा मुंबईकडे रवाना
  • मोर्चापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश
  • ४० अटीशर्तीसह मोर्चाला परवानगी

 Manoj Jarane Morcha: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा मुंबईच्या दिशेने काढण्यात येणार होता. बुधवारी (२७ ऑगस्ट) सकाळी १० वाजता जालन्यातील अंतरवाली सराटी येथून हा मोर्चा रवाना होणार होता. मोर्चाची पहिली टप्प्यातील विश्रांती जुन्नरमध्ये ठेवण्यात आली होती. या मोर्चामार्गात पुढे राजगुरुनगर, खेड, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी आणि चेंबूर अशी ठिकाणं पार करत, २८ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानात पोहोचण्याची योजना होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (२६ ऑगस्ट) एक महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. त्यानुसार, पुढील दोन आठवड्यांसाठी कोणत्याही प्रकारचं आंदोलन, सभा वा मोर्चा यासाठी पूर्वपरवानगी घेणं आवश्यक ठरेल. पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही आंदोलन करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Todays Gold-Silver Price: गणेश चर्तुर्थीच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

या पार्श्वभूमीवर, गुरुवारी (२८ ऑगस्ट) वकील विनोद पोखरकर यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, “कोर्ट आम्हाला आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी नक्कीच देईल, त्यामुळे आम्ही याचिका दाखल करणार नाही,” असे स्पष्टीकरण विनोद पोखरकर यांनी दिल्याचे समजते. या घडामोडींमुळे पुढील काही तास अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. मनोज जरांगे गुरुवारी संध्याकाळपर्यंत मुंबईत पोहोचणार असल्याने, तत्पूर्वी उच्च न्यायालयाकडून आणखी काही निर्देश येतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, महायुती सरकारकडूनही मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधून आंदोलन थांबवण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, मसाजोग गावातूनही मोठा पाठिंबा मिळत आहे. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आंतरवाली सराटीकडे रवाना झाल्याचे सांगितले आहे. “आजच्या आरक्षणाच्या लढ्यात भाऊ संतोष देशमुख यांची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे. गरजू मराठ्यांच्या लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता,” असे धनंजय देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. मसाजोग येथून नऊ पिकअप आणि सहा चारचाकी वाहनांसह नागरिक आंतरवाली सराटीकडे रवाना झाले असून, मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग अपेक्षित आहे.

Ganeshotsav 2025 : लाडक्या गणपतीबाप्पाचे आज घराघरात आगमन; श्रींच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त नेमका कधी?

मुंबईत आंदोलनासाठी निघालेल्या मनोज जरांगे यांनी जालना पोलिसांन काही अटीशर्तीसंह परवानगी दिली आहे. जालना पोलिसांनी जरांगेंना परवानगीसह 40 अटींचे पत्र पाठवले आहे. पोलिसांनी जरांगेंना कोर्टाच्या निर्णयाची प्रत दिली होती. पण त्यानतंरही आपण मुंबईला जाण्याबाबत ठाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

प्रवासादरम्यान आक्षेपार्ह घोषणा, जातीय तेढ निर्माण करणारी विधाने होऊ नये.

जाहीर केलेला मार्गच वापरावा; प्रवासादरम्यान मार्ग बदलू नये.

रुग्णवाहिका, फायर ब्रिगेड आदी अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी.

प्रवासादरम्यान जर खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले, तर त्याची भरपाई आयोजक आणि आंदोलनकर्त्यांना करावी लागेल.

नागरिकांनी हातात घातक शस्त्र, लाठी, तलवार, दगड, ज्वलनशील पदार्थ बाळगू नयेत.

यासह आणखी ३५ अटीही न्यायालयाकडून घालण्यात आल्या आहेत.

 

Web Title: Important order of bombay high court before manoj jaranges march permission with 40 conditions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2025 | 09:38 AM

Topics:  

  • Manoj Jarange
  • Maratha Reservation
  • OBC Reservation

संबंधित बातम्या

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हायकोर्टाचा नकार, मात्र पोलिसांची परवानगी, ‘या’ अटीशर्तींसह आझाद मैदानावर…
1

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हायकोर्टाचा नकार, मात्र पोलिसांची परवानगी, ‘या’ अटीशर्तींसह आझाद मैदानावर…

Eknath Shinde on Manoj Jarange : गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता, सगळी विघ्नं तोच दूर करेल
2

Eknath Shinde on Manoj Jarange : गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता, सगळी विघ्नं तोच दूर करेल

Maratha Reservation: “काय उचकायचं ते उचका, मी त्यांना…”; जरांगे पाटलांच्या टिकेला चित्रा वाघांचे प्रत्युत्तर
3

Maratha Reservation: “काय उचकायचं ते उचका, मी त्यांना…”; जरांगे पाटलांच्या टिकेला चित्रा वाघांचे प्रत्युत्तर

Manoj Jarange Morcha: मुंबईत आल्यावर मला गोळ्या घाला….; मोर्चापूर्वी जरांगेंचा आंतरवली सराटीतून एल्गार
4

Manoj Jarange Morcha: मुंबईत आल्यावर मला गोळ्या घाला….; मोर्चापूर्वी जरांगेंचा आंतरवली सराटीतून एल्गार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.