Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ladki Bahin Yojna: ‘लाडकी बहीण’ योजनेत महत्त्वाची अपडेट; इन्कम टॅक्स विभागाशी सामंजस्य करार होणार

सरकारसाठी ‘लाडकी बहीण’ योजना आर्थिकदृष्ट्या डोईजड ठरू लागली आहे, हे सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 29, 2025 | 09:18 AM
Ladki Bahin Yojna: ‘लाडकी बहीण’ योजनेत महत्त्वाची अपडेट; इन्कम टॅक्स विभागाशी सामंजस्य करार होणार
Follow Us
Close
Follow Us:

Ladki Bahin Yojna:  ‘लाडकी बहीण’ योजनेच्या अर्जांची काटेकोर पडताळणी सुरू झाली असून अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने हालचाली गतीमान केल्या आहेत. याअंतर्गत प्राप्तिकर विभागाकडे अहवाल मागवण्यात आला होता. मात्र, तो अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने आता राज्य सरकार आणि इन्कम टॅक्स विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

‘लाडकी बहीण’ योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने हालचाली वेगात सुरू केल्या आहेत. प्राप्तिकर विभागाकडे याआधीच संबंधित माहितीचा अहवाल मागवण्यात आला होता. मात्र, तो अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने आता सरकार आणि इन्कम टॅक्स विभाग यांच्यात लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे. मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे. ‘लाडक्या बहिणीं’शी संबंधित माहितीची गोपनीयता राखण्यासाठी हा करार केला जाणार आहे.

Todays Gold-Silver Price: आनंदाची बातमी! सोन्याचे दर पुन्हा नरामले, चांदीच्या किंमती स्थिर

आतापर्यंत बाद झालेल्या अर्जांची स्थिती

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला – 2 लाख 30 हजार

वय 65 वर्षांपेक्षा अधिक असलेल्या महिला – 1 लाख 10 हजार

कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहन असलेले, नमोशक्ती योजनेचे लाभार्थी आणि स्वेच्छेने अर्ज मागे घेणाऱ्या महिला – 1 लाख 60 हजार

शेतीच्या वादातून संतापाचा स्फोट: पुतण्याकडून काकू व चुलत भावाची हत्या, नंतर स्वतः विष प्राशन करून केली आत्महत्या

एकूण अपात्र महिला लाभार्थ्यांची संख्या – सुमारे 5 लाख

लाडक्या बहिणी झाल्या डोईजड

सरकारसाठी ‘लाडकी बहीण’ योजना आर्थिकदृष्ट्या डोईजड ठरू लागली आहे, हे सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे. या योजनेवर खर्च होणाऱ्या मोठ्या निधीमुळे राज्याच्या इतर विकासकामांवर परिणाम झाल्याचे स्पष्ट होत आहे. शिंदे गटातील काही मंत्रीही याबाबत खुलेपणाने मत व्यक्त करत आहेत.

सरकारी तिजोरी रिकामी असल्यामुळेच सध्याच्या 1500 रुपयांवर वाढ करून 2100 रुपये देण्याबाबत सरकारने कोणताही स्पष्ट निर्णय घेतलेला नाही. त्याउलट, अपात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून त्यांना योजनेतून वगळण्याची मोहीमच सुरू झाली आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत ‘लाडकी बहिण’ लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Important update in ladki bahin scheme mou to be signed with income tax department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2025 | 09:18 AM

Topics:  

  • Ladki Bahin Yojna

संबंधित बातम्या

Ladki Bahin Yojna News: 1500 रुपये नको, लाडक्या बहिणींचे रक्ताने पत्र…; देवेंद्र फडणवीस बहिणींची ‘ही’ इच्छा पूर्ण करणार का?
1

Ladki Bahin Yojna News: 1500 रुपये नको, लाडक्या बहिणींचे रक्ताने पत्र…; देवेंद्र फडणवीस बहिणींची ‘ही’ इच्छा पूर्ण करणार का?

Ladki Bahin Yojna Latest update: लाडक्या बहिणींना सरकारचा दणका; अपात्र महिलांचा लाभ बंद होणार
2

Ladki Bahin Yojna Latest update: लाडक्या बहिणींना सरकारचा दणका; अपात्र महिलांचा लाभ बंद होणार

Ladki Bahin Yojna News: लाडकी बहीण योजना थांबणार? राज्य सरकारचा नवा निर्णय, रक्षाबंधनापूर्वी महिलांना मोठा धक्का
3

Ladki Bahin Yojna News: लाडकी बहीण योजना थांबणार? राज्य सरकारचा नवा निर्णय, रक्षाबंधनापूर्वी महिलांना मोठा धक्का

Ladki Bahin Yojna News: लाडकी बहीण योजनेवरून राजकारण तापणार; आक्रमक महिलांचा थेट उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा
4

Ladki Bahin Yojna News: लाडकी बहीण योजनेवरून राजकारण तापणार; आक्रमक महिलांचा थेट उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.