Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हापुरात हसन मुश्रीफांनी खासदार संजय मंडलिकांचे काम अडवले; जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातच जोरदार शाब्दिक चकमक

कोल्हापुरात अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी खासदार संजय मंडलिक यांचे काम अडवल्याचा आरोप शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयमध्ये चांगलेच घमासान झाले.अजित पवार भाजपला मांडीला मांडी लावून बसल्यानंतर शिंदे गटाची अवस्था सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाटणीला आली अशी झाली आहे.

  • By Aparna
Updated On: Sep 13, 2023 | 03:18 PM
कोल्हापुरात हसन मुश्रीफांनी खासदार संजय मंडलिकांचे काम अडवले; जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातच जोरदार शाब्दिक चकमक
Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : कोल्हापुरात अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी खासदार संजय मंडलिक यांचे काम अडवल्याचा आरोप शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयमध्ये चांगलेच घमासान झाले.अजित पवार भाजपला मांडीला मांडी लावून बसल्यानंतर शिंदे गटाची अवस्था सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाटणीला आली अशी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून याची चर्चा ठळकपणे रंगली असतानाच त्याचे थेट पडसाद आज कोल्हापुरात उमटले.

कोल्हापुरात अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी खासदार संजय मंडलिक यांचे काम अडवल्याचा आरोप शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार यांनी केला. त्यामुळे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयमध्ये चांगलेच घमासान झाले. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात शाब्दिक चकमक झाली. अजित पवार गटाला सोबत घेऊन अडचण झाल्याचा आरोपही राजेखान जमादार यांनी केला. यावेळी पीडब्ल्यूडी विभागातील अधिकाऱ्यांना प्रश्नांचा भडीमार करत जाब विचारण्यात आला.

जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार यांनी संबंधित अधिकाऱ्याला कॅमेऱ्यासमोर आणत काम कोणी थांबवलं आहे हे जाहीरपणे सांगावे अशी मागणी केली. ते म्हणाले की, अडवून ठेवण्यात आलेल्या कामाची प्रक्रिया पूर्ण झाली असून जून महिन्यात टेंडर निघाले आहे, पण ठेकेदाराच्या मर्जीसाठी वर्क ऑर्डर देत नाहीत, असं काम चालणार नाही. अन्यथा, पीडब्ल्यूडीला xxx करु. अजित पवार गट सत्तेत सहभागी करून घेतल्याने अडचण होत असल्याचा आरोपही राजेखान जमादार यांनी केला. फक्त इथंच नाही, तर कागलमध्ये अडचण होत आहे. सरळ त्यांचे नाव सांगतात. टेंडर रद्द करण्यास सांगण्यात आले, पण केलेलं नाही असेही अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे जमादार म्हणाले. विकासकामासाठी निधी आणला म्हणून जाहिरात करणाऱ्यांनी टेंडर रद्द करण्यासाठी कसं सांगतात? असा सवाल त्यांनी केला.

नेमका वाद कशावरून झाला?
जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, कागल मतदारसंघातील एका रस्त्याचे कामांचे टेंडर खासदार संजय मंडलिक यांच्या पत्रामुळे बजेटमधून मंजूर झालं. त्या कामाचे टेंडरही निघाले होते. यानंतर प्रक्रिया होऊन टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली. त्याची वर्क ऑर्डर देण्यात येणार होती. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी वर्क ऑर्डर नेत्याच्या सांगण्यावरून देण्यास टाळाटाळ केली. दुसऱ्या ठेकेदाराच्या मर्जीसाठी ही टाळाटाळ केली. देतो म्हणून सांगूनही आता संबंधित नेत्याला भेटून या, असे अधिकारी सांगत आहेत, त्याशिवाय देणार नाहीत म्हणत आहेत. नियमानुसार प्रक्रिया केली असताना भेटाभेटी कशासाठी? ही पद्धत चुकीची आहे. विकासकामात अडथळा आणू नये. नातेवाईकांच्या ठेकेदारांना सांभाळण्यासाठी हे काम टाळाटाळ करत आहेत. पालकमंत्र्यांनी सुद्धा काम द्या म्हणून सांगितलं आहे. संजय मंडलिकांनी काम काढल्यानंतर यांच्याकडून (मुश्रीफ गटाकडून) आडवं पडण्याचा काम सुरु आहे. संजय मंडलिक लोकांना त्रास देत नाहीत, पण यांच्याकडून अडवणूक सुरु आहे.

 

Web Title: In kolhapur hasan mushrif blocked mp sanjay mandlikas work a verbal clash broke out in the district collectors office premises nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2023 | 03:18 PM

Topics:  

  • Hasan Mushrif
  • kolhapur
  • maharashtra
  • maharashtra news
  • Sanjay Mandlik

संबंधित बातम्या

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर
1

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
2

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
3

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
4

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.