Matheran News: ई रिक्षासाठी हातरीक्षा चालकांचे उपोषण सुरू, ई रिक्षांची संख्या वाढवण्याची मागणी
माथेरान : माथेरान या शहरात पर्यावरण पुरक ई रिक्षा चालवण्यात येते. मात्र अद्याप माथेरान मधील ७४ हात रिक्षा चालक यांच्यासाठी ई रिक्षा चालवण्याची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे हात रिक्षा चालक यांनी माथेराम शहरातील श्रीराम चौक येथे उपोषण सुरू केले आहे.
माथेरान मध्ये सध्या २० ई रिक्षा चालवल्या जात असून सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाने हातरिक्षा चालक यांना अमानवी प्रथेतून मुक्त करण्यासाठी ई रिक्षा चालवण्याचे धोरण न्यायालयाचे आहे.मात्र माथेरान शहरातील ९४ हातरिक्षा चालक यांच्या पैकी केवळ २० हातरिक्षा चालक यांचा ई रिक्षा चालवण्यास मिळाल्या आहेत.त्यात माथेरान दस्तुरी नाका ते हुतात्मा स्मारक माथेरान बाजारपेठ या अंतरासाठी प्रति माणसी ३५ दर आकारला जात असल्याने तीन ते चार माणसे ओढणाऱ्या हात रिक्षा मध्ये कोणीही पर्यटक बसत नाही.त्यामुळे व्यवसाय होत नसल्याने आणि गिऱ्हाईक मिळत नसल्याने शहरात पर्यटकांची ने आण करण्यासाठी असलेल्या ७४ हातरिक्षा चालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे माथेरान मधील हातरिक्षा चालक यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.आज पासून शहरातील श्रीराम चौक येथे उपोषण सुरू झाले असून शुभम गायकवाड आणि नागेश कदम हे हात रिक्षाचालक उपोषणाला बसले आहेत.
ई रिक्षा यांची संख्या वाढावी आणि पर्यटक तसेच स्थानिक नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय दूर व्हावी अशी मागणी गेली वर्षभर सुरू आहे.मात्र एप्रिल २०२५ मध्ये सर्वोच्य न्यायालयाने राज्य सरकारला ई रिक्षा बाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. सदर अहवाल राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वोच्य न्यायालयात पोहचला आहे.मात्र न्यायालयाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि त्यामुळे हात रिक्षाचालक यांना ई रिक्षा चालवण्याची परवानगी मिळाली नाही.त्यामुळे माथेरान मधील हात रिक्षा चालक यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार आज सकाळी येथील श्रीराम चौक येथे उपोषण सुरू झाले असून या उपोषणाला माथेरान शहरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. शहरातील शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी,शिवसेना ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख कुलदीप जाधव तसेच माथेरान मध्ये ई रिक्षा आणणारे सुनील शिंदे यांच्यासह हात रिक्षा चालला यांचे कुटुंबीय उपोषणाला पाठिंबा देत तेथे बसून आहेत.