Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंजाबात घुमला विठ्ठल नामाचा जयघोष!

पंढरपूर ते घुमान रथ व सायकल यात्रेचे पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी केले स्वागत

  • By Aparna
Updated On: Dec 11, 2023 | 08:34 PM
पंजाबात घुमला विठ्ठल नामाचा जयघोष!
Follow Us
Close
Follow Us:

फलटण : श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान (पंजाब) असा  २,१०० किलोमीटरच्या रथ व सायकल यात्रेचे पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी राजभवनमध्ये स्वागत केले. यावेळी उपस्थित भाविकांनी विठ्ठल नामाचा जयघोष करीत आनंद सोहळा साजरा केला.

भागवत धर्माचे ज्येष्ठ प्रचारक, संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची ७५३ वी जयंती, संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा ७२७ वा संजीवन समाधीदिन सोहळा व शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानकदेव यांच्या ५५४ व्या जयंतीनिमित्त भागवत धर्म प्रसारक मंडळ, राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ आणि श्री नामदेव दरबार कमिटी घुमान (पंजाब)  यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत नामदेव महाराज यांची श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान अशी रथ व  सायकल यात्रा काढण्यात आली होती. शांती, समता, बंधुता या संत विचारांचा प्रचार-प्रसार  करीत महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, दिल्ली व हरियाणा राज्याचा प्रवास करीत ही यात्रा शनिवारी पंजाब राज्याची राजधानी चंदिगड येथे पोहोचली. राजभवनात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी यात्रेचे स्वागत केले.
या यात्रेत सर्व वयोगटातील सुमारे शंभर सायकलयात्री सहभागी झाले आहेत. या स्वागत समारंभास भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, पालखी सोहळा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुभाष भांबुरे, खजिनदार मनोज मांढरे, दत्तात्रय पवार, चंद्रकला भिसे, नामदेव दरबार कमिटीचे सरपंच नरिन्द्र सिंह निंदी, अध्यक्ष तरसेम सिंह बावा, महासचिव सुखजिन्द्र सिंह बावा, उप सचिव मनजिन्द्र सिंह बावा, प्रेस सचिव सर्बजीतसिंह बावा यांच्यासह सायकल यात्री उपस्थित होते. ही यात्रा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीदिन सोहळ्याच्या दिवशी म्हणजे दि. ११ रोजी श्री क्षेत्र घुमाण येथे पोहोचेल. दि १२ डिसेंबर रोजी सायकल यात्रेची सांगता होणार आहे.

देश जोडण्यासाठी यात्रा उपयुक्त
राज्यपाल बनवारीलाल म्हणाले, भारतीय संस्कृती जतन करण्याचे व जोपासण्याचे काम तुम्ही करीत आहात. नव्या पिढीला संतांचे विचार देवून तुम्ही त्यांना प्रवृत्त तुम्ही करत आहे, तुमची ही निस्वार्थ सेवा असून भागवत धर्माचा प्रचार व प्रसार हे मोठे काम आहे आणि ती काळाची गरज आहे. ही यात्रा देश जोडण्यासाठी उपयुक्त आहे. ते तुम्ही करीत आहात ही अभिमानाची बाब आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

Web Title: In punjab there was a shout of vitthals name nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2023 | 08:34 PM

Topics:  

  • maharashtra
  • maharashtra news
  • Pandharpur News
  • Phaltan

संबंधित बातम्या

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप
1

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप

Bhiwandi News  : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध
2

Bhiwandi News : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
3

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
4

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.