
चुकीच्या पद्धतीने वीज बिलाची आकारणी; ग्राहकांना बसतोय फटका, 'हे' कारण...
मल्हारपेठ : वीज वितरण कंपनीच्या चुकीच्या कारभाराचा ग्राहकांना फटका बसला आहे. मीटर रीडिंग घेणारे कंत्राटी कर्मचारी संपावर असल्याने वाढीव बिल वीज मल्हारपेठच्या वितरण कंपनीने ग्राहकांना दिल्याने प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
मल्हारपेठ (ता.पाटण) कार्यालयाच्या वतीने लाईट बिलाची ज्यादा रीडिंगने आकारणी केल्याने शिवसेना ठाकरे गटाकडून विज वितरण कंपनीला निवेदन दिले. यात लवकर सुधारणा न झाल्यास ‘शिवसेना स्टाईल’ने उत्तर दिले जाणार असल्याचा इशारा वीज वितरण कंपनीने कॉन्ट्रॅक्ट बेसवर नेमलेल्या रीडिंग कर्मचाऱ्यांनी गेल्या महिन्यापासून संप केल्यामुळे मागील महिन्यातील मीटर रीडिंग न घेता विज बिल वितरित केल्यामुळे ग्राहकांच्या मीटर रिडींगमध्ये 50 ते 100 युनिट ज्यादा रिडिंग आल्याने ज्यादा पैशाचा भुर्दंड ग्राहकांना सोसावा लागला आहे. ही बाब ग्राहकांच्या लक्षात आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मल्हार पेठ येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत जा विचारला.
गेल्या दोन महिन्यांपासून वीज वितरण कंपनीने नेमलेल्या मीटर रीडिंग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी संप केल्यामुळे मागील ऑक्टोंबर महिन्यातील मीटर रिडींग न घेतल्यामुळे ग्राहकांना वाढीव लाईट बिल आले आहेत. मल्हार पेठ व भाग कार्य क्षेत्रातील अनेक ग्राहकांना अशा स्वरूपात लाईट बिल आल्यामुळे ही बाब निदर्शनास आले.
हेदेखील वाचा : २५ वर्षे मोफत वीज! दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी महावितरणची ‘SMART’ योजना; काय आहे ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र’ स्कीम?
तसेच चालू महिन्यातील ही मीटर रिडींग न घेतल्यामुळे आत्ता येणारे लाईट बिल ही मागील लाईट बिलाप्रमाणेच वाढवून येणार असल्याने ग्राहक संभ्रम अवस्थेत आहे ही बाब ज्यांच्या लक्षात येत आहे. ते महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत आहेत. यामध्ये संबंधित अधिकारी म्हणाले, ‘हे दुरुस्त करून देतो, आमच्या हातात काही नाही. हे वरिष्ठ लेवलला विचारावे लागेल’ अशी उत्तरे देत आहेत. तर सर्वसामान्य ग्राहकाला याबाबत येतं किंचितही माहिती नसल्यामुळे त्यांना या वीज बिलाचा फटका बसत आहे.