Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! मराठा ठोक मोर्चाचा इशारा; शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेरील पोलीस बंदोबस्तात वाढ

राज्यात मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. जागोजागी राजकीय नेतेमंडळींना अडवून त्यांच्याकडून मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याच आग्रह केला जात आहे. दिवसेंदिवस आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 12, 2024 | 10:12 AM
मोठी बातमी! मराठा ठोक मोर्चाचा इशारा; शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेरील पोलीस बंदोबस्तात वाढ
Follow Us
Follow Us:

पुणे: नुकत्यात हाती आलेल्या बातमीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर  पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाने इशारा दिल्यानंतर हा बंदोबस्त वाढण्यात आल्याची माहिती आहे. रविवारी (11 ऑगस्ट) सोलापूरातील कुर्डूवाडी येथे मराठा आंदोलकानी शरद पवारांची गाडी थांबवत त्यांना मराठा आरक्षणाविषयीची भूमिका स्पष्ट कऱण्याचा आग्रह धरला. त्यावेळी आपला मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर आजही  मराठा क्रांती ठोक मोर्चाने त्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या रिंगणात; फेसबुकवरून उमेदवारीची घोषणा

दरम्यान, काल (11 ऑगस्ट) शरद पवार सोलापूर दौऱ्यावर होते. बार्शीत शेतकरी संवाद मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी ते निघाले असताना बार्शीतील टेंभुर्णी कुर्डूवाडी रस्त्यावर मराठा आंदोलकांनी शरद पवार यांची गाडी रोखली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका प्रमुख सागर लोकरे आणि मराठा आंदोलकांनी शरद पवारांची गाडी अडवली होती.

गाडीच्या समोर आलेल्या आंदोलकांनी एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी  करत मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणीही केली. आंदोलकांनी गाडी अडवल्यानंतर शरद पवार गाडीतून बाहेर उतरले आणि आंदोलकांचे म्हणणेही ऐकून घेतले.  त्यानंतर त्यांनी “मराठा  आरक्षणाला आपला पाठींबा आहे,” असे स्पष्टपणे  सांगितले. शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आंदोलकांनी पवारांची गाडी सोडली.

दरम्यान, राज्यभरात आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. ठिकठिकाणी नेतेमंडळींना अडवून जाब विचारला जात आहे. विधानसभा निवडणुकीआधीच आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी मराठा समाजाकडून केली जात आहे. दुसरीकडे मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांनीदेखील जनजागृती आणि शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. तर राज्यभरात मराठा समाज बांधवही रस्त्यावर उतरताना दिसून येत आहेत.

 

Web Title: Increase in police presence outside sharad pawars residence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2024 | 09:40 AM

Topics:  

  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

‘मी आणि समाज कधीच मागे सरकणार नाही’; मनोज जरांगे पाटलांचा निर्धार
1

‘मी आणि समाज कधीच मागे सरकणार नाही’; मनोज जरांगे पाटलांचा निर्धार

Manoj Jarange Patil: ‘मेलो तरी चालेल,मी…’, मनोज जरांगे आक्रमक, चौकशांवरून सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले-‘रात्र वैऱ्याची आहे’
2

Manoj Jarange Patil: ‘मेलो तरी चालेल,मी…’, मनोज जरांगे आक्रमक, चौकशांवरून सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले-‘रात्र वैऱ्याची आहे’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.