Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange Patil: ‘मेलो तरी चालेल,मी…’, मनोज जरांगे आक्रमक, चौकशांवरून सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले-‘रात्र वैऱ्याची आहे’

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण आंदोलनाशी संबंधित सहकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर दबाव आणि षडयंत्राचे आरोप केले आहेत. समाजाने सावध आणि एकजूट राहावे, असे आवाहन करत त्यांनी सरकारला मागण्यांवर कार्यवाहीसाठी दिलेल्या तीन महिन्यांच्या मुदतीचा उल्लेख केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 28, 2026 | 12:48 PM
'मेलो तरी चालेल,मी त्यांना...',मनोज जरांगे आक्रमक, चौकशांवरून सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले-‘रात्र वैऱ्याची आहे, सावध राहा’

'मेलो तरी चालेल,मी त्यांना...',मनोज जरांगे आक्रमक, चौकशांवरून सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले-‘रात्र वैऱ्याची आहे, सावध राहा’

Follow Us
Follow Us:
  • ‘रात्र वैऱ्याची आहे, सावध राहा’
  • सहकाऱ्यांना नोटिसांनंतर मनोज जरांगेंचा इशारा
  • ‘मेलो तरी शरण जाणार नाही’
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारने कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी आपण मराठा आरक्षणाच्या लढ्यातून मागे हटणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारशी तडजोड किंवा मैत्री करण्याऐवजी संघर्ष सुरू ठेवण्याची भूमिका त्यांनी मांडली. छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना जरांगे यांनी हे वक्तव्य केले.

मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

“सावध राहा, सतर्क राहा. रात्र वैऱ्याची आहे, ते षडयंत्र रचत आहेत. काम करणाऱ्यांना अडचणीत आणत आहेत. दबावातून चौकश्या सुरु आहेत. त्यामुळे एकजूट राहा. संकटात तोंड देण्याची हिंमत ठेवा, असे सांगत जरांगे यांनी समर्थकांना संकटांचा सामना करण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन केले. “आपलं कोणी नाही, आपले आपणच आहोत,” अशी भूमिका मांडत समाजाने कोणत्याही परिस्थितीत एकजूट सोडू नये, असेही त्यांनी म्हटले. पण तुम्हाला सांगतो, मेलो तरी चालेल, मी त्यांना शरण जाणार नाही, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Manoj Jarange Patil: ‘जेलमध्ये गेलो तरी…’, मिशीवर ताव देत शिंदेंच्या स्टाईलची नक्कल; मनोज जरांगे म्हणाले, ‘आम्हीही रडायला लावणार

कार्यवाही न झाल्यास आंदोलन पुढे…

दरम्यान, जरांगे यांनी २० दिवसांचे उपोषण संपवताना राज्य सरकारला मराठा आरक्षणाशी संबंधित मागण्यांवर कार्यवाही करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली होती. सरकारी शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी उपोषण स्थगित केले होते; मात्र आंदोलन संपलेले नसल्याचे स्पष्ट केले होते. मागण्यांवर अपेक्षित कार्यवाही न झाल्यास आंदोलन पुढे नेण्याची भूमिका त्यांनी मांडली होती.

आता या तीन महिन्यांच्या कालावधीत आपल्याला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. दबाव किंवा चौकशीमुळे आपण भूमिका बदलणार नसल्याचे सांगताना त्यांनी “मेलो तरी चालेल, पण शरण जाणार नाही,” अशी भूमिका मांडली. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार आणि जरांगे यांच्यातील संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.

सहकाऱ्यांवरील आरोप आणि चौकशांचा मुद्दा

जरांगे यांच्या काही सहकाऱ्यांविरोधात आर्थिक व्यवहार आणि कथित वाळू व्यवसायासंबंधी आरोप करण्यात आले आहेत. त्यांचे माजी सहकारी अजय बारसकर यांनी ईडीकडे तक्रार केल्याचे माहिती समोर आली. हे आरोप बारसकर यांचे असून त्यांची स्वतंत्रपणे चौकशी सुरू आहे. आरोप सिद्ध झाल्याचे समजू नये. जरांगे यांनी मात्र या घडामोडींना आंदोलनातील लोकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. याआधीही सहकाऱ्यांच्या आयकर चौकशीची माहिती समोर आल्यानंतर त्यांनी सरकारवर टीका केली होती आणि चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली होती. आपल्या प्रकृतीचाही उल्लेख करत जरांगे यांनी मराठा समाजासाठी केलेल्या उपोषणांमुळे शरीरावर गंभीर परिणाम झाल्याचे सांगितले. डॉक्टरांनी प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले होते. या सर्व परिस्थितीतही मराठा आरक्षणाच्या मागणीवरून माघार घेणार नसल्याची भूमिका त्यांनी पुन्हा अधोरेखित केली.

Manoj Jarange Patil : जरांगेंनी उपोषण सोडलं, पण वाद पेटला! ‘ED ची भीती वाटली म्हणून पाटोद्यात थांबले’; सहकाऱ्याचा धक्कादायक दावा

Web Title: Manoj jarange patil warns supporters stay united alleges conspiracy says will not surrender

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 12:48 PM

Topics:  

  • maharashtra
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Mumbai Goa Highway: कशेडी ते लोटे महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा! नऊ महिन्यांत ४० अपघात, १२ जणांचा मृत्यू
1

Mumbai Goa Highway: कशेडी ते लोटे महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा! नऊ महिन्यांत ४० अपघात, १२ जणांचा मृत्यू

Transport Employees Salary Hike: वेतनवाढीसाठी परिवहन कर्मचारी आक्रमक; आज काम बंद आंदोलनावर ठाम, प्रवाशांचे हाल होणार?
2

Transport Employees Salary Hike: वेतनवाढीसाठी परिवहन कर्मचारी आक्रमक; आज काम बंद आंदोलनावर ठाम, प्रवाशांचे हाल होणार?

Maharashtra Badminton Association च्या अध्यक्षपदी अरुण लखानी, तर सिद्धार्थ पाटील यांची मानद सरचिटणीसपदी बिनविरोध निवड
3

Maharashtra Badminton Association च्या अध्यक्षपदी अरुण लखानी, तर सिद्धार्थ पाटील यांची मानद सरचिटणीसपदी बिनविरोध निवड

ओटी भरणे, आहेर करणे, दुखवटा देणे, गारवा आणणे, परडी सोडणे, वाण देणे या रीतीरिवाजांच्या कोणकोणत्या परंपरा आणि नियम आहेत? जाणून घ्या
4

ओटी भरणे, आहेर करणे, दुखवटा देणे, गारवा आणणे, परडी सोडणे, वाण देणे या रीतीरिवाजांच्या कोणकोणत्या परंपरा आणि नियम आहेत? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.