IND vs NZ 2nd Test Pitch Report
India vs New Zealand 2nd Test Pitch Report : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या भारतीय संघासाठी मागचा आठवडा दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हता. न्यूझीलंडने प्रथम भारताला अवघ्या 46 धावांत ऑलआऊट केले आणि त्यानंतर 36 वर्षांनंतर घरच्या मैदानावर टीम इंडियाचा सात गडी राखून विजय मिळवला. मालिकेत ०-१ ने पिछाडीवर पडल्यानंतर आता पुण्यात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला पलटवार करावा लागणार आहे.
पुण्याची खेळपट्टी कशी आहे?
पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. स्टेडियममध्ये आतापर्यंत केवळ दोन कसोटी सामने खेळले गेले आहेत. ज्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला. नाणेफेक जिंकणे खूप महत्त्वाचे असेल. येथे पहिल्या डावाची सरासरी 430 धावा आणि दुसऱ्या डावाची सरासरी 190 धावांची आहे. तिसऱ्या डावात सरासरी 237 धावा आणि चौथ्या डावात 107 धावा केल्या जातात. येथे सर्वात मोठी धावसंख्या भारताच्या नावावर आहे, जी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 601/5 केली. सर्वात कमी स्कोअर ऑस्ट्रेलियाचा होता, ज्याने 105/10 अशी आकडेवारी नोंदवली. आम्ही पुण्यात रँक टर्नर पाहण्याची अपेक्षा करू शकतो, जिथे चौथ्या डावात धावा करणे अत्यंत अवघड असेल आणि फिरकीपटू मदत करतील. त्याचप्रमाणे फलंदाज सुरुवातील अधिकाधिक धावादेखील काढू शकतात.
आतापर्यंत भारताने एक सामना जिंकला
भारताने एक सामना जिंकला, एक सामना गमावला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम हे सुब्रत रॉय सहारा स्टेडियम म्हणूनही ओळखले जाते. या मैदानावर आतापर्यंत केवळ दोनच कसोटी सामने खेळले गेले आहेत, ज्यात भारताचा विक्रम संमिश्र झाला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 333 धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर भारताने 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा एका डावाने पराभव केला. यावेळीही विराट कोहली कर्णधार होता. विराट कोहलीच्या 254 धावांच्या नाबाद खेळीने प्रोटीज संघाचा एक डाव आणि 137 धावांनी पराभव करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
गहुंजे स्टेडियमची तयारी पूर्ण
ग्राऊंडची तयारी पूर्ण झाली आहे. पावसाची शक्यता कमीच असून आला तरी पाण्याचा निचरा होऊन अर्ध्यातासात ग्राऊंड पुन्हा खेळण्यासाठी तयार होईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. पिचचीदेखील तयारी पूर्ण केली आहे. BCCI च्या क्युरेटर टीम कडून याची सर्व पाहणी पूर्ण झाली आहे. तसेच, जवळजवळ 70 ते 80 टक्के तिकीटविक्री झाली आहे. यामध्ये तिकिटांची किंमत 1.5 लाख ते 455 रुपयांपर्यंत रक्कम असल्याचे देखील त्यांनी सांगितले. – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशचे सचिव कमलेश पिसाळ