Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंद्रायणी पुन्हा फेसाळली: आळंदीत नागरिकांच्या आरोग्याला धोका, नदीला गटारीचे प्राप्त झाले स्वरूप

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने बहुतांश ठिकाणच्या नद्यांचे पाणी आटते. मात्र, आळंदीतील इंद्रायणीला विविध गावच्या सांडपाण्याचे वाहून येण्याचे प्रमाण मोठे आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 04, 2025 | 09:35 PM
इंद्रायणी पुन्हा फेसाळली: आळंदीत नागरिकांच्या आरोग्याला धोका, नदीला गटारीचे प्राप्त झाले स्वरूप
Follow Us
Close
Follow Us:

आळंदी: पिंपरी चिंचवड महानगर पालिका, तसेच उगमस्थानापासून विविध ठिकाणी नदीपात्रात मिसळत जाणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे आळंदीत इंद्रायणी नदीला आता हिमनगाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शुक्रवारी (दि. ४) सकाळपासून इंद्रायणीच्या पात्रात पांढराशुभ्र फेसाचे मोठ्या आकारातील थर तरंगत असल्याने भाविकांचे, तसेच जलचर प्राण्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषणाची पातळी मोठी असल्याने इंद्रायणीच्या पात्राला गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

चिखली, कुदळवाडीतील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामावर महापालिकेने कारवाई केल्यानंतर इंद्रायणीतील प्रदूषण कमी होईल, असा दावा तेथील राजकीय मंडळी करत होती. मात्र, हा दावा पूर्णतः फोल ठरला आहे. कारण, अद्यापपर्यंत इंद्रायणीच्या प्रदूषणाची पातळी अजिबात कमी झाली नाही. याउलट महापालिका हद्दीतून सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे दिवसेंदिवस इंद्रायणीतील पाण्याला उग्र वास, कधी हिरवट तर कधी काळपट रंग होत आहे. याचबरोबर इंद्रायणीच्या उगमस्थानापासून विविध ग्रामपंचायती, नगरपरिषद हद्दीतील सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळले जात आहे. एवढेच काय केळगाव ग्रामपंचायत, आळंदी नगरपरिषदेचे सांडपाणीही इंद्रायणीत सोडले जात आहे.

सांडपाण्यामुळे नदीपात्राला गटारीचे स्वरूप

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने बहुतांश ठिकाणच्या नद्यांचे पाणी आटते. मात्र, आळंदीतील इंद्रायणीला विविध गावच्या सांडपाण्याचे वाहून येण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे नदी बारमाही वाहत असल्याचे चित्र आहे.  सध्या आळंदीतील इंद्रायणीत कोठेही जा सांडपाण्यामुळे नदीपात्राला गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ठिकठिकाणी काळपट रंगाचे पाणी वाहताना दिसते. याचबरोबर जलपर्णीही मोठ्या प्रमाणात आहे.

Devendra Fadnavis: “… हे एका दिवसाचे काम नाही”; फेसाळलेल्या ‘इंद्रायणी’बाबत CM फडणवीसांचे भाष्य

प्रदूषित पाणी असूनही आळंदीत इंद्रायणी घाटावर अनेक नागरिक या प्रदूषित पाण्यातच स्नान करतात. आचमन करतात. काही लोक कपडे धुतात. गाड्याही धुतात. मात्र, स्थानिक पातळीवर नगर परिषद प्रशासन यावर कोणत्याही प्रकारची बंदी घालताना दिसत नसल्याचे चित्र आहे. प्रदूषणामुळे जलचर प्राण्याचे आरोग्य धोक्यात आले आहे.

फेसाळलेल्या ‘इंद्रायणी’बाबत CM फडणवीसांचे भाष्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेचे काम सुरू आहे. हे एका दिवसाचे काम नाही. सर्व गाव, शहरात उद्योगांचे पाणी जे  इंद्रायणी मध्ये जाते ते साफ करुन शुद्ध पाणी नदीत सोडायचे आहे.  त्याचे काम सुरु केले आहे.  यासाठी वेगवेगळी गावे, ग्रामपंचायत, नगरपंचायतींना निधी उपलब्ध करुन देत आहोत. तसे उद्योगांना देखील निर्देश दिले आहेत. त्यामुळे लवकरच इंद्रायणी स्वच्छ होणार आहे.

Web Title: Indrayani river polluted once again in alandi pune marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2025 | 09:35 PM

Topics:  

  • Pune
  • pune news
  • Water problem

संबंधित बातम्या

ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…
1

ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…

Pune News : पुणेकरांनो थंडीत शेकोटी पेटवू नका! अन्यथा दंडात्मक कारवाई; महापालिकेचा अजब इशारा
2

Pune News : पुणेकरांनो थंडीत शेकोटी पेटवू नका! अन्यथा दंडात्मक कारवाई; महापालिकेचा अजब इशारा

पुणे की शिमला? नागरिक गारठले; शहरात पुढील दोन दिवसांमध्ये…, कसे असणार तापमान?
3

पुणे की शिमला? नागरिक गारठले; शहरात पुढील दोन दिवसांमध्ये…, कसे असणार तापमान?

Pune Accident : अवजड वाहनांचा कहर! हिंजवडीत डंपरच्या धडकेत २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, वडील गंभीर जखमी
4

Pune Accident : अवजड वाहनांचा कहर! हिंजवडीत डंपरच्या धडकेत २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, वडील गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.