देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बदलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले (फोटो - सोशल मीडिया)
आळंदी: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी आळंदी येथे आले होते. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच आळंदी दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समधीचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आळंदी दौऱ्यावर आले असता वारकऱ्यांकडून मोठ्या उत्साहात स्वागत केले गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विधानपरिषदेचे राम शिंदे आणि मंत्री पंकजा मुंडे या देखील उपस्थित होते, तर देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी इंद्रायणी नदीबाबत देखील भाष्य केले आहे.
आळंदीमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज मला अतिशय आनंद झाला आहे की पांडुरंगाच्या आशीर्वादाने एक भव्य विजय आम्हाला प्राप्त झाला आहे. आज आळंदीला येण्याची संधी मिळाली. माऊलींचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली, प्रत्येकासाठी हा क्षण सुखाचा असतो. तो क्षण मी अनुभवला. आपला महाराष्ट्र वारकरी विचारानेच पुढे जात आहे. याच विचाराची आठवण सतत होत रहावी यासाठी आज इथे आलोआहे.”
🕠 संध्या. ५.१७ वा. | ३-१-२०२५📍आळंदी, पुणे.
LIVE | 'संत कृतज्ञता संवाद' कार्यक्रम#Maharashtra #Pune https://t.co/NJe59VJAn3
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 3, 2025
पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेचे काम सुरू आहे. हे एका दिवसाचे काम नाही. सर्व गाव, शहरात उद्योगांचे पाणी जे इंद्रायणी मध्ये जाते ते साफ करुन शुद्ध पाणी नदीत सोडायचे आहे. त्याचे काम सुरु केले आहे. यासाठी वेगवेगळी गावे, ग्रामपंचायत, नगरपंचायतींना निधी उपलब्ध करुन देत आहोत. तसे उद्योगांना देखील निर्देश दिले आहेत. त्यामुळे लवकरच इंद्रायणी स्वच्छ होणार आहे.
छगन भुजबळ यांच्या शायरीला CM देवेंद्र फडणीसांचं उत्तर
‘वाक़िफ़ कहाँ ज़माना हमारी उड़ान से, वो और थे जो हार गए आसमान से’, अशी शायरी छगन भुजबळ यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यात नायगावमध्ये सावित्रीबाईच्या मूळगावी आयोजित एका कार्यक्रमात बोलून दाखवली. त्याच्या या शायरीतही मंत्रिमंडळातून डावलल्याचा नाराजीचा सूर होता. दरम्यान त्यांच्या या शायरीला मुख्यंमत्री देवेंद्र फडवीस यांनीही प्रतिसाद देत ‘मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर, लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया’ असं एकप्रकारे उत्तर दिलं आहे.
हेही वाचा: ‘मैं अकेला ही चला था मगर,…’ ; छगन भुजबळ यांच्या शायरीला CM देवेंद्र फडणीसांचं उत्तर
विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मात्र ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं. मंत्रिमंडळात जागा न मिळाल्याने छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी जाहीरपणे आपल्या भावना मांडल्या. ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला त्यांच्या बंगल्यावरही पोहोचले होते. आता एका कार्यक्रमानिमित्त पुन्हा एकदा भुजबळ आणि फडणवीस एकत्र आल्याने चर्चांना उधाण आले आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त साताऱ्याजवळील नायगाव या सावित्रीबाईच्या मूळगावी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांच्यासह नाराज छगन भुजबळ यांनी हजेरी लावली.