Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिलांवरील अन्याय सहन करणार नाही, तृप्ती देसाई यांचा इशारा; शिक्रापुरात भूमाता ब्रिगेडचे कार्यालय सुरु

महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) हुंडा मुक्त महाराष्ट्र, हुंडा विरोधी चळवळ सुरु करण्यात आलेली असून स्त्री स्त्रीभ्रूण हत्या मुक्त महाराष्ट्र आम्ही करणार असून महिलांवर होणारे अन्याय आम्ही सहन करणार नसल्याचा इशारा भूमाता ब्रिगेड व भूमाता फाउंडेशनच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी दिला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 22, 2023 | 02:31 PM
महिलांवरील अन्याय सहन करणार नाही, तृप्ती देसाई यांचा इशारा; शिक्रापुरात भूमाता ब्रिगेडचे कार्यालय सुरु
Follow Us
Close
Follow Us:

शिक्रापूर : महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) हुंडा मुक्त महाराष्ट्र, हुंडा विरोधी चळवळ सुरु करण्यात आलेली असून स्त्री स्त्रीभ्रूण हत्या मुक्त महाराष्ट्र आम्ही करणार असून महिलांवर होणारे अन्याय आम्ही सहन करणार नसल्याचा इशारा भूमाता ब्रिगेड व भूमाता फाउंडेशनच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी दिला.

भूमाता ब्रिगेड व भूमाता फाउंडेशनच्या शिरुर तालुका कार्यालयाचे उदघाटन भूमाता ब्रिगेड व भूमाता फाउंडेशनच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या हस्ते शिक्रापूर (ता. शिरुर) येथे नुकतेच करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, सरपंच रमेश गडदे, माजी पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ गव्हाणे, ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा मंगल सासवडे, मानव विकास परिषदचे प्रदेशाध्यक्ष संदीप कुटे, तालुकाध्यक्ष मिना गवारे, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेश सरचिटणीस डॉ. पवन सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, सुभाष खैरे, शालन राऊत, पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे, सिनेकलाकार कैलास ढोकले, उद्योजक अरुण गायकवाड, लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष शरद टेमगिरे, बाजार समितीचे संचालक बाबासाहेब सासवडे, सुरेखा इंगळे, सुरेखा कांबळे, कविता जकाते, कल्पना ढोकले, ललिता पोळ, मंगल सोनवणे आदी उपस्थित होते.

आता महिलांची ताईगिरी दिसेल

देसाई म्हणाल्या, आता बस झाली दादागिरी व भाईगीरी. आता महिलांची ताईगिरी दिसेल. महिलांनी अन्याय झाल्यास घाबरून न जाता अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. महिला एकत्र आल्यास कोणीही काही करु शकत नाही. मात्र, त्यासाठी महिलांनी सक्षम बनले पाहिजे. यावेळी महिलांसाठी हळदी कुंकू तसेच आरोग्य शिबीर देखील संपन्न झाले.

विधवा प्रथा बंद करा

महिलांनी स्त्री जन्माचे स्वागत करुन मुलींना चांगल्या दर्जाची वागणूक द्यावी तसेच विधवा महिला पद्धत बंद करुन प्रत्येक महिलेला हळदी कुंकू आदी कार्यक्रमामध्ये सहभागी करुन घेत महिलांमध्ये भेदभाव न करता समान वागणूक देणे गरजेचे असल्याचे देखील तृप्ती देसाई यांनी सांगितले. प्रास्ताविक सुरेखा इंगळे यांनी केले. तालुकाध्यक्षा मंगल सासवडे यांनी आभार मानले.

दर महिन्याला जनता दरबार घेणार

शिरुर तालुक्यातून महिलांच्या अनेक समस्या असून आमच्याकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये शिरुर तालुक्यातील तक्रारींची संख्या जास्त असून महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या वतीने प्रत्येक महिन्यात शिरुर तालुक्यात जनता दरबार भरवण्यात येणार असल्याचे देखील तृप्ती देसाई यांनी सांगितले.

Web Title: Injustice against women will not be tolerated tripti desais warning office of bhumata brigade started in shikrapur nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2023 | 02:31 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • Pune
  • pune news
  • महिला

संबंधित बातम्या

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस
1

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘या’ बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचे लोकार्पण
2

पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘या’ बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचे लोकार्पण

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित
3

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

महाराष्ट्रातील नद्यांना आला महापूर; कृष्णामाई, नृसिंहवाडीसह अनेक देवदेवतांच्या चरणांना झाला अभिषेक
4

महाराष्ट्रातील नद्यांना आला महापूर; कृष्णामाई, नृसिंहवाडीसह अनेक देवदेवतांच्या चरणांना झाला अभिषेक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.