मुंबई : ठमहायुतीच्या जागा वाटपामध्ये प्रत्येकाचा मान सन्मान राखला जाईल, तसेच, ज्या जागा निवडून निश्चितपणे निवडून येऊ शकतात, अशी जागांसंबंधी लवकरात लवकर एकत्रितरित्या बैठका घेण्याच्या सूचाना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी महायुतीच्या नेत्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे. अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असताना मुंबई महत्त्वाच्या घडामोडी घडल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई दौऱ्याचा समारोप कऱण्यापूर्वी अमित शाह यांच्या उपस्थित मुंबई विमानतळावर महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, देंवेंद्र फडणवीस, सुनील तटकरे, हे नेते उपस्थित होते. या बैठकीत जागावाटपासंदर्भात चर्चा झाली. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीतील सर्व मित्रपक्षांना सन्मानजनक जागा दिल्या जातील असा शब्द दिल्याची माहिती समोर आली आहे. पण महायुतीतील जागावाटपा संदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागावाटपासंदर्भात दिल्लीत अंतिम चर्चा होईल, असेही सांगितले जात आहे.
हेही वाचा: आंदेकर खूनप्रकरणी मोठी अपडेट; हत्यारे पुरवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे लोकसभेवेळी झालेल्या चुका विधानसभेला होऊ नयेत, अशा सुचनाही अमित शाहांनी महायुतीच्या नेत्यांना दिल्याचे सांगितले जात आहे. तसेच महायुतीतील मतभेद चव्हा्च्यावर येऊ नयेत आणि जाहीर वाद टाळावेत, महायुतीच्या नेत्यांनी काहीही बोलताना संयम ठेवून बोलावे, अशाही सुचना अमित शाहांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर, ज्या उमेदवारांमध्ये जिंकून येण्याची क्षमता आहे ते निश्चित करावेत आणि विरोधकांच्या खोट्या नॅरेटिव्हलाही उत्तर द्या, अशाही सूचना त्यांनी दिल्या आहेत.
याशिवाय या बैठकीत भाजपच्या अंतर्गत सर्व्हेकडेही अमित शाह यांनी लक्ष वेधले. राज्य सरकारने घेतलेले निर्णय जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचवा, तसेच भाजपच्या काही आमदारांची कामगिरी समाधानकारक नाही,त्यामुळे जागांबाबत योग्य निर्णय घ्यावेत, असेही अमित शाहांनी महायुतीच्या नेत्यांना सूचना दिल्या आहेत.
हेही वाचा: मुंबई दौऱ्यात अमित शहांनी महायुतीच्या नेत्यांना खडसावले; म्हणाले, लोकसभा निवडणुकीतील…