Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nitish Kumar : अमित शाहांच्या उपस्थितीत नीतीश कुमार यांचा राज्यसभेचा अर्ज दाखल; लवकरच देणार CM पदाचा राजीनामा

बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार हे आता राज्यसभा खासदार होणार आहे. त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाहांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 05, 2026 | 03:08 PM
Nitish Kumar files nomination for Rajya Sabha in presence of Amit Shah

Nitish Kumar files nomination for Rajya Sabha in presence of Amit Shah

Follow Us
Follow Us:
  • नीतीश कुमार राज्यसभा नामांकन अर्ज दाखल
  • अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये नीतीश कुमार यांचा अर्ज
  • बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा देणारा राजीनामा
Nitish Kumar : नवी दिल्ली : राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली असून अनपेक्षित नावे समोर येत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार (Nitish Kumar) यांनी बिहार सोडून दिल्लीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारचे मुख्यमंत्री आता राज्यसभा खासदार होणार आहे. याबाबत त्यांनी आज सकाळी सोशल मीडिया पोस्ट करुन माहिती दिली होती. यानंतर एनडीएचा घटक पक्ष असलेल्या नीतीश कुमार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीमध्ये नामांकन अर्ज दाखल केला आहे.

बिहारमध्ये विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपच्या युतीला घवघवीत यश मिळाले होते. यानंतर नीतीश कुमार यांनी नवा विक्रम करत 10 व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर लगेचच त्यांनी दिल्लीमध्ये जाण्याचे स्वप्नपूर्ती करत राज्यसभेचे खासदार होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी राज्यसभेसाठी नामांकर अर्ज दाखल केला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शाह हे देखील उपस्थित आहेत. त्यांच्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री कोण होणार यावरुन चर्चा रंगली आहे.

राज्य सभा के लिए अपना नामांकन पत्र दाखिल किया। pic.twitter.com/R9mDOHUfYr — Nitish Kumar (@NitishKumar) March 5, 2026

हे देखील वाचा : बिहारच्या राजकारणात भूकंप! नीतीश कुमार दिल्लीला गेल्यानंतर कोण सांभाळणार मुख्यमंत्रिपदाची धुरा?

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार काय म्हणाले?

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, “दोन दशकांहून अधिक काळ तुम्ही माझ्यावरचा विश्वास आणि पाठिंबा कायम ठेवला आहे आणि त्यामुळेच मी बिहार आणि तुम्हा सर्वांची पूर्ण निष्ठेने सेवा केली आहे. तुमच्या विश्वास आणि पाठिंब्याच्या बळावरच आज बिहार विकास आणि आदराचे एक नवीन आयाम सादर करत आहे. मी यापूर्वी अनेक वेळा तुमचे आभार मानले आहेत.”

हे देखील वाचा : नितीश कुमार मुख्यमंत्रिपद सोडणार? बिहारच्या राजकारणात काय आहे गेम चेंजर प्लॅन!

माझी एक इच्छा होती

ते पुढे म्हणाले, “माझ्या संसदीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच मला बिहार विधिमंडळ आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांचा सदस्य होण्याची इच्छा होती. या संदर्भात, मी या निवडणुकीत राज्यसभेचा सदस्य बनण्याचा प्रयत्न करीत आहे.”
मी तुम्हाला पूर्ण प्रामाणिकपणे खात्री देऊ इच्छितो की तुमच्याशी असलेले हे नाते भविष्यातही कायम राहील आणि विकसित बिहार उभारण्यासाठी तुमच्यासोबत काम करण्याचा माझा संकल्प अढळ राहील. स्थापन होणाऱ्या नवीन सरकारला माझे पूर्ण समर्थन आणि मार्गदर्शन असेल.” असे नीतीश कुमार म्हणाले आहेत.

Web Title: Nitish kumar files nomination for rajya sabha in presence of amit shah

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Bihar Politics
  • Nitish Kumar
  • Rajyasabha Election

संबंधित बातम्या

Sanjay Raut News: १७ सप्टेंबरला केंद्रात काहीतरी मोठं होणार!संजय राऊतांचा खळबळजनक दावा
1

Sanjay Raut News: १७ सप्टेंबरला केंद्रात काहीतरी मोठं होणार!संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Delhi Politics: दिल्लीच्या राजकारणात मोठा भुकंप…; देवेंद्र फडणवीसांना उपपंतप्रधान बनवण्याचा RSS चा प्लॅन
2

Delhi Politics: दिल्लीच्या राजकारणात मोठा भुकंप…; देवेंद्र फडणवीसांना उपपंतप्रधान बनवण्याचा RSS चा प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.