Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑडिओ क्लिपवरून राजकीय वादळ! खान्देश भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची भाजप पदाधिकारी तसेच राज्यातील एका मंत्र्याशी संवाद साधतानाची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 31, 2026 | 01:30 PM
मोठी बातमी ! उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठा धक्का; 'या' बड्या नेत्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश

मोठी बातमी ! उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठा धक्का; 'या' बड्या नेत्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश

Follow Us
Follow Us:

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची भाजप पदाधिकारी तसेच राज्यातील एका मंत्र्याशी संवाद साधतानाची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये नंदुरबारच्या माजी खासदार डॉ. हिना गावित, माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित तसेच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणानंतर विजय चौधरी यांनी पक्षाच्या प्रदेश संयोजक पदाचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे खान्देश भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. नंदुरबार जिल्ह्यात गावित समर्थकांनी राळ उठवली असून निषेध व्यक्त करण्यासोबतच चौधरींच्या अटकेसाठी निवेदन देण्यात येत आहेत. यामुळे खान्देशात भाजपमधील अंतर्गत वातावरण चांगलेच ढवळून निघालेले आहे.

 

मंत्री गिरीश महाजन यांच्याशी कथित संवाद

विजय चौधरी यांची कथित ऑडिओ क्लिप ही जलसंपदा मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांच्याशी झालेल्या संवादाची असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या क्लिपची अधिकृत पुष्टी झालेली नाही. या कथित संभाषणात चौधरी यांनी डॉ. विजयकुमार गावित सहकार्य करीत नसल्याचा तसेच कोणत्याही कार्यक्रमात आपल्याला बोलवत नसल्याचा आरोप केल्याचे समोर आले आहे. तसेच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबाबतही त्यांनी वक्तव्य केल्याचे या क्लिपमध्ये दिसून येत असल्याचा दावा केला जात आहे. रक्षा खडसे केंद्रात मंत्री असून त्यांचे सासरे एकनाथ खडसे हे वेगळ्या पक्षात आहेत. एकाच कुटुंबात वेगवेगळ्या भूमिका कशा चालतील, असा सवाल करत त्यांनी रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याबाबत मत व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. या कथित क्लिपमध्ये गिरीश महाजन यांचा कोणताही संवाद ऐकू येत नसून, ते केवळ ‘हं…हं’ करताना ऐकू येत असल्याचे सांगितले जात आहे.

हे सुद्धा वाचा : भिवंडी दुर्घटनेवर सरकार ॲक्शन मोडमध्ये! दोषींवर कठोर कारवाईचे आदेश, मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

नवी आणि जुनी भाजपमध्ये संस्कृतीचा मोठा फरक

या प्रकरणावर भाजपमधील कोणत्याही वरिष्ठ नेत्याने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, भाजपमध्ये असताना सर्वांचा सन्मान केला जात होता; मात्र आता पक्षातील महिलांचाही अपमान होत असल्याचे दिसत आहे. या प्रकरणी पक्षाच्या नेत्यांनी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. विजय चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे खान्देशातील भाजपमध्ये राजकीय वातावरण तापले असून, पक्षाचे वरिष्ठ नेते या प्रकरणावर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Internal infighting within the bjp has come to light due to a viral audio clip

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • BJP
  • eknath khadse
  • girish mahajan

संबंधित बातम्या

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं
1

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत
2

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस? आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस? आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

Owaisi on Gadkari : ‘मजलिसवाले माझ्या घरी येऊन बसले आहेत,’ ओवैसींनी सांगितला गडकरींसोबतचा किस्सा; भाजपवर टीका पण गडकरींचं कौतुक
4

Owaisi on Gadkari : ‘मजलिसवाले माझ्या घरी येऊन बसले आहेत,’ ओवैसींनी सांगितला गडकरींसोबतचा किस्सा; भाजपवर टीका पण गडकरींचं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.