Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुंतवणुकीच्या आमिषाने साडे पंधरा लाखांचा गंडा; गुजरातमधून आरोपीला घेतले ताब्यात

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास मोठा फ़ायदा हाईल असे सांगून एकाची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्याला चिखली पोलिसांनी गुजरात येथे जाऊन बेड्या ठोकल्या. दिनेश पथुजी ठाकोर (26  रा. छाबलीया, गुजरात) असे अटक आरोपीचे नाव आहे. 

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 18, 2024 | 01:24 PM
गुंतवणुकीच्या आमिषाने साडे पंधरा लाखांचा गंडा; गुजरातमधून आरोपीला घेतले ताब्यात
Follow Us
Close
Follow Us:
पिंपरी : शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास मोठा फ़ायदा हाईल असे सांगून एकाची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्याला चिखली पोलिसांनी गुजरात येथे जाऊन बेड्या ठोकल्या. दिनेश पथुजी ठाकोर (26  रा. छाबलीया, गुजरात) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे 2023 मध्ये चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका व्यक्तीस फोन करुन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात नफा मिळत असल्याच्या योजना सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानुसार फिर्यादी यांनी प्रथम 50 हजारांची गुंतवणूक केली. त्याच्या मोबदल्यात त्यांना सव्वा लाखाचा नफ़ा झाल्याचे दर्शविण्यात आले.
पुन्हा गुंतवणूक करण्यास सांगून, फिर्यादी यांना डीमट खाते काढून देण्याचे आश्वासन देऊन गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करण्यात आले. तसेच चेतन पटेल व संजय पटेल यांच्या मार्फत ट्रेडींग करा, असे सांगून फिर्यादीस वेळोवेळी गुंतवणूक करण्यास भाग पाडून आरोपीने फिर्यादी यांना वेळोवेळी तुमचा तोटा झाला आहे. तो तुम्ही पैसे भरा, पैसे भरले नाही तर पोलीस केस होइल अशी धमकी देवून फिर्यादी यांच्याकडून एकूण 15 लाख 47 हजार 259 रुपये घेतले. फिर्यादी यांना त्यांच्या नावाने डी मॅट खातेच नसल्याचे समजल्यानंतर त्यानी दिलेल्या तक्रारीवरुन चिखली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासात चिखली पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने संभाषणासाठी वापरण्यात आलेले फोन, फिर्यादीने पैशाचे व्यवहार करताना वापरलेली बॅंक खाती याचे तांत्रिक दृष्टीने विश्लेषण करुन आरोपीचा शाेध घेतला. आरोपीचा मोबाईल बंद असल्यामुळे व तो व्हॉटसअपवर संपर्कात राहत असल्याने त्याचे लोकेशन मुंबई, सुरत, अहमदाबाद, गुजरात अशा वेगवेगळ्या ठिकाणी येत होते. त्यामुळे आरोपीला शोधण्याचे मोठे अव्हान पोलीसांसमोर होते.
तांत्रिक तपासाच्या आधारावर आरोपी हा त्याचे मूळ गावी गुजरात या ठिकाणी पळून गेला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी एक पथक गुजरात येथे पाठवून आरोपीला अटक केली. आरोपीने गुन्हा केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यामधील 15 लाख 47 हजार 259 रुपये जप्त केले. ही कामगिरी चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोगले, पोलीस हवालदार गोडांबे, मोहिते यांनी केली.

Web Title: Investment fraudster arrested 15 lakh 40 thousand rupees seized by the police nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2024 | 01:24 PM

Topics:  

  • maharashtra
  • NAVARASHTRA
  • Pimpri Crime

संबंधित बातम्या

चकना सेंटर चालवणाऱ्या तरुणावर चाकूने वार, दगडानेही मारहाण; नेमकं काय घडलं?
1

चकना सेंटर चालवणाऱ्या तरुणावर चाकूने वार, दगडानेही मारहाण; नेमकं काय घडलं?

Air Pollution : राज्यात धोक्याची घंटा! मुंबई, पुणे नागपूरसह प्रमुख शहरे प्रदूषणाच्या विळख्यात
2

Air Pollution : राज्यात धोक्याची घंटा! मुंबई, पुणे नागपूरसह प्रमुख शहरे प्रदूषणाच्या विळख्यात

Pandharpur : पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून चिकन मसाला, वारकऱ्यांमध्ये संताप
3

Pandharpur : पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून चिकन मसाला, वारकऱ्यांमध्ये संताप

Rohit Pawar : “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आधार कार्ड २० रुपये,” मतदार यादी वादात रोहित पवार यांचा मोठा खुलासा
4

Rohit Pawar : “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आधार कार्ड २० रुपये,” मतदार यादी वादात रोहित पवार यांचा मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.