चकना सेंटर चालवणाऱ्या तरुणावर चाकूने वार, दगडानेही मारहाण; नेमकं काय घडलं?
पिंपरी : देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, धमक्या, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. गुन्हेगारीला आळा घालण्याची नागरिकांची मागणी आहे. अशातच आता पिंपरीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. चकना सेंटर चालवणाऱ्या तरुणाला धमकी देऊन, त्याच्यावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच त्याच्या दोन मित्रांना मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले आहे.
आरोपींमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. ही घटना शनिवारी (१८ ऑक्टोबर) सायंकाळी ओरा हॉटेल समोर, कुदळवाडी ब्रिज, चिखली येथे घडली आहे. आदित्य कैलास बालटकर (वय २३, घरकुल, चिखली), साहिल गावडे, हनुमंत सोडनर अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी आदित्य यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार साहिल शेख (चिंचवड), भाभी उर्फ मेहरुन शेख (चिंचवड), केशव मोती विश्वकर्मा (२५, रहाटणी), वकील मस्जिद खान (२०, चिंचवड) आणि इतर चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आदित्य आणि त्यांचा मित्र साहिल गावडे चकना विकत असताना आरोपी भाभी तिथे आली. “तू यहा स्नॅक्स सेंटर कैसा चलाता है मै देखती” असे म्हणत चकना सेंटर बंद करण्याची धमकी दिली. तिने तिचा मुलगा सोहेल शेख याला बोलावले. आरोपी केशव आणि वकील यांनी येऊन आदित्य यांना दगडाने मारहाण केली. तर भाभीने चाकूने वार केले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या दोन मित्रांना मारहाण करून जखमी केले. पोलिसांनी केशव आणि वकील या दोघांना अटक केली आहे. चिखली पोलीस पुढील तपास करीत आहेत.
तासगावात मित्रानेच केली मित्राची हत्या
तासगाव तालुक्यातील पाचवा मैल (निमणी) येथे शनिवारी सकाळी जुन्या वादाच्या रागातून एका व्यक्तीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आहे. याप्रकरणी नागांव येथील दोघांविरोधात तासगाव पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. मृताचे नाव चेतन उर्फ बुलट्या दुर्व्या पवार (४५, रा. पाचवा मैल, ता. तासगाव) असे आहे. याबाबत त्यांचा भाचा गणेश सुनिल काळे यांनी रोहित उर्फ बाळया पोपट मलमे (वय २६) आणि दत्तात्रय मच्छिंद्र गुजले (वय ३६) (दोघे रा. नागांव, ता. तासगाव) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.