Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाई नगरपालिकेच्या शाळा क्र. १० मध्ये नियमबाह्य समिती, नगरसेवक गुरुप्रसाद चव्हाण यांचा गंभीर आरोप

वाई नगरपालिकेच्या शाळा क्र. १० मध्ये शाळा व्यवस्थापन समितीची निवड नियमबाह्य झाल्याचा आरोप नगरसेवक गुरुप्रसाद चव्हाण यांनी केला आहे. त्यांनी ही समिती बरखास्त करण्याची मागणी केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 19, 2026 | 10:05 PM
वाई नगरपालिकेच्या शाळा क्र. १० मध्ये नियमबाह्य समिती (Photo Credit- X)

वाई नगरपालिकेच्या शाळा क्र. १० मध्ये नियमबाह्य समिती (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • वाई नगरपालिकेच्या शाळा क्र. १० मध्ये नियमबाह्य समिती
  • नगरसेवक गुरुप्रसाद चव्हाण यांचा गंभीर आरोप
वाई : वाई नगरपालिकेच्या शाळा क्र. १० मध्ये शाळा व्यवस्थापन समिती गठीत करताना गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप संबंधित प्रभागाचे नगरसेवक श्री. गुरुप्रसाद चव्हाण यांनी केला आहे. नियमबाह्य पद्धतीने समितीची स्थापना करून अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांची नेमणूक करण्यात आल्यामुळे स्थानिक स्तरावर संताप व्यक्त होत आहे.

नगरसेवक चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनानुसार, सिद्धनाथवाडी प्रभागातील शाळा क्र. १० ही त्यांच्या कार्यक्षेत्रात येत असतानाही शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता संपूर्ण प्रक्रिया पार पाडली. विशेष म्हणजे, पालकांची सभा न घेता आणि कोणतीही पारदर्शक प्रक्रिया न राबवता समिती गठीत करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

शासकीय नियमानुसार शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विद्यार्थ्यांच्या पालकाचीच नियुक्ती होणे आवश्यक असताना, या नियमाची सरळसरळ पायमल्ली झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच, समितीची रचना ही राजकीय दबावाशिवाय व लोकशाही पद्धतीने व्हावी हा उद्देश असताना प्रत्यक्षात मात्र एकतर्फी निर्णय घेतल्याचे निदर्शनास आले आहे.

सांगलीत जिल्हा परिषद शाळांचा डंका! गुढीपाडव्याला ६०.९४% प्रवेश पूर्ण; तीन वर्षांत पटसंख्येत १० टक्क्यांची विक्रमी वाढ

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित नियमबाह्य समिती तात्काळ बरखास्त करावी, तसेच मुख्याध्यापकांवर शिस्तभंगाची कारवाई करून नव्याने पारदर्शक पद्धतीने समिती गठीत करावी, अशी ठाम मागणी नगरसेवक गुरुप्रसाद चव्हाण यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन याकडे कशी दखल घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

भाऊसाहेब शिक्षण विभागाकडे विशेष लक्ष द्या

लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी नगरपालिका निवडणूकीत वाई शहराच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विशेष परिश्रम घेणार असल्याचे अभिवचन दिले आहे.नगराध्यक्षपदाच्या खुर्चीत बसल्यापासून सावंत भाऊसाहेबांनी नगरपालिका प्रशासनाची झाडाखडती घेतली.आता त्यांनी शिक्षण विभागाच्या प्रगतीसाठी ऍक्शन मोडवर येण्याची अपेक्षा शिक्षणप्रेणी नागरिक करीत आहेत.

Satara News : गुढीपाडवा पट वाढवा या जिल्हा परिषदेच्या उपक्रमाची उत्साहात सुरुवात!

Web Title: Irregular committee at wai municipal school no 10 councilor guruprasad chavan levels serious allegation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 10:05 PM

Topics:  

  • Satara News
  • Wai

संबंधित बातम्या

Satara News : गोडोलीत पालिकेचा हातोडा; रस्त्यावरील १५ फलक हटविले !
1

Satara News : गोडोलीत पालिकेचा हातोडा; रस्त्यावरील १५ फलक हटविले !

Umbraj News: उंब्रज जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट कामामुळे ग्रॅनाईट कोसळले; ३ विद्यार्थी जखमी; शिक्षण सभापती तेजस्विनी कदम आक्रमक!
2

Umbraj News: उंब्रज जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट कामामुळे ग्रॅनाईट कोसळले; ३ विद्यार्थी जखमी; शिक्षण सभापती तेजस्विनी कदम आक्रमक!

Wai News: वाई शहरात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? बेकायदेशीर गुटखा विक्री, ट्रिपल सीट अन् बुलेटच्या फटाक्यांनी वाईकर हैराण
3

Wai News: वाई शहरात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? बेकायदेशीर गुटखा विक्री, ट्रिपल सीट अन् बुलेटच्या फटाक्यांनी वाईकर हैराण

Wai News: धान्य गोदामामागील रस्ता चिखलात; प्रशासनाचे दुर्लक्ष, वाहनचालक, व्यापारी व ग्राहक त्रस्त; तातडीने दुरुस्तीची मागणी
4

Wai News: धान्य गोदामामागील रस्ता चिखलात; प्रशासनाचे दुर्लक्ष, वाहनचालक, व्यापारी व ग्राहक त्रस्त; तातडीने दुरुस्तीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.