Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis: “…तसेच समाजातही एकात्मता असणे आवश्यक”; नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

इंडियन पोलीस फाऊंडेशनच्या १० व्या स्थापना दिनानिमित्त भारताच्या आर्थिक विकासासाठी पोलीस दलाची पुनर्कल्पना या विषयावर चर्चा सत्राचे पोलीस मुख्यालय, कुलाबा येथे आयोजन करण्यात आले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 20, 2025 | 09:03 PM
Devendra Fadnavis: "...तसेच समाजातही एकात्मता असणे आवश्यक"; नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

Devendra Fadnavis: "...तसेच समाजातही एकात्मता असणे आवश्यक"; नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

Follow Us
Close
Follow Us:

गुन्ह्याची उकल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक
अमली पदार्थ संदर्भातील गुन्ह्ये हे पोलीस दलासमोर आव्हान
कायदा व सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीने देश महासत्तेकडे वाटचाल

मुंबई: कायदा व सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीने देश महासत्तेकडे वाटचाल करू शकतो. कायदा व सुव्यवस्थेचे पालन करताना अमली पदार्थ संदर्भातील गुन्हे हे पोलीस दलासमोर आव्हान ठरत असून यासाठी झीरो टॉलरन्स धोरण राज्याने अवलंबले आहे. तसेच बदलत्या काळानुसार सायबर क्षेत्रातील गुन्ह्याची उकल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

इंडियन पोलीस फाऊंडेशनच्या १० व्या स्थापना दिनानिमित्त  “भारताच्या आर्थिक विकासासाठी पोलीस दलाची पुनर्कल्पना” या विषयावर चर्चा सत्राचे पोलीस मुख्यालय, कुलाबा येथे आयोजन करण्यात आले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांनी कायम उच्च दर्जा टिकवून ठेवल्याचा अभिमान आहे. पोलीस आज भारताच्या आर्थिक विकासावर चर्चा करीत आहेत ही अभिनंदनीय बाब असून, पोलीस दलात आणखी चांगले बदल घडविण्यासाठी आजच्या कार्यक्रमात होणारे विचार मंथन महत्वपूर्ण ठरतील. या विचारमंथनातून येणारे नवीन उपाययोजनांचा शासन सकारात्मक विचार करेल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,पोलीस दल तसेच समाजातही एकात्मता असणे आवश्यक आहे. यामुळे समाजातील नकारात्मकता कमी होते आणि राज्य व देश शाश्वत प्रगतीकडे वाटचाल करू शकतो. काळानुरूप गुन्ह्यांचे स्वरूप बदलले असून, जुन्या काळातील शाश्वत मुल्यांसह नव तंत्रज्ञानाचा वापर केल्यास प्रगती शक्य आहे. त्यानुसार २०२३ मध्ये नवीन पोलीस संघटनात्मक रचना तयार केली आहे. गुन्ह्यांची जलद उकल करण्यास मदत व्हावी यासाठी अत्याधुनिक सायबर सिक्युरिटी लॅब उभारण्यात आली आहे.

LIVE | Indian Police Foundation (IPF) Annual Day 2025

🕛 11.47am | 20-9-2025 📍Mumbai.@IPF_ORG#Maharashtra #IPFAnnualDay2025 #Mumbai https://t.co/y7VUlfJJza

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 20, 2025

 

इतर देशांनीही आपल्या राज्यासारखी लॅब बनविण्याची मागणी केली आहे. एआयच्या सहायाने गुंतागुंतीचे गुन्हे प्रकरणे अधिक वेगाने सोडविण्यात मदत होत आहे. देश आणि राज्याची तिन्ही दल सक्षम असल्याने अमली पदार्थांच्या माध्यमातून गुन्हेगारी वाढविणे आणि तरूणांना निष्क्रीय करण्यात येत आहे. आज अमली पदार्थांची गुन्हेगारी पोलीस दलासमोर एक आव्हान आहे. यामध्ये झीरो टोलरन्स असणे महत्वाचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

‘देवाभाऊ’ एकच मन कितीदा जिंकाल! ‘महाराष्ट्र गीत’ वाजलं नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी थेट…; पहा Viral Video

संविधानात पोलीस व्यवस्थेत चेक अँड बॅलन्सची तरतूद असून अनेक अधिकाऱ्यांनी उपलब्ध कायद्यांचा वापर करून परिवर्तनशील सुधारणा केल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आयपीसी, सीआरपीसी व इंडियन एव्हिडन्स अॅक्ट हे इंग्रजांच्या काळातील कायदे असल्याने लोकशाहीच्या अधिष्ठानावर त्यात आवश्यक बदल करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. पोलीसांची भूमिका अधिक प्रभावी होण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि डिजीटल व्यासपीठांचा वापर करणे आवश्यक आहे. सोशल मीडिया आणि ऑनलाईन प्लॅटफॉमद्वारे गुन्हेगारी वाढत असून, डेटा ॲनालिटिक्स, मशीन लर्निंग आणि डिजिटल ट्रॅकिंग, ऑनलाईन गुन्ह्यांवर जलद प्रतिसादासाठी विशेष असे नव तंत्रज्ञान आणि पद्धती वापरणे आवश्यक आहे, असे फडणवीस म्हणाले.

Web Title: It is essential to use modern technology to solve cybercrime said by cm devendra fadnavis maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2025 | 08:52 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • cyber crime
  • Maharashtra Police

संबंधित बातम्या

‘देवाभाऊ’ एकच मन कितीदा जिंकाल! ‘महाराष्ट्र गीत’ वाजलं नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी थेट…; पहा Viral Video
1

‘देवाभाऊ’ एकच मन कितीदा जिंकाल! ‘महाराष्ट्र गीत’ वाजलं नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी थेट…; पहा Viral Video

Devendra Fadnavis: “उद्योगांना लागणाऱ्या इमारत बांधकाम परवानगीसाठी…”; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
2

Devendra Fadnavis: “उद्योगांना लागणाऱ्या इमारत बांधकाम परवानगीसाठी…”; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Devendra Fadnavis: “मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेच्या…”; मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट निर्देश
3

Devendra Fadnavis: “मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेच्या…”; मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट निर्देश

Devendra Fadnavis: “पुढील 8 वर्षांत पोलाद निर्मितीत…”; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
4

Devendra Fadnavis: “पुढील 8 वर्षांत पोलाद निर्मितीत…”; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.