जालना जिल्हा रुग्णालयासमोर दोन गटात तुफान राडा, दगडफेकीत 5 जण जखमी
जालना येथे गुरुवार दुपारी ४:३० वाजता दोन गटात तुफान दगडफेक करण्यात आली. या घटनेत ५ जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दगडफेकीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. जालन्यातील कदीम जालना पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
राज्यात अपघाताचे सत्र सुरुचं; वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
जालना जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर दोन गटात दगडफेक सुरु असताना, सर्वसामान्य नागरीक सैरावैरा पळू लागले. दगडफेकीचं कारण अद्याप समोर येऊ शकले नाही, परंतु रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णाला भेटण्यासाठी आलेल्या एका गटावर सुरुवातीला चाकूने हल्ला झाला. त्यानंतर तुफान दगडफेक सुरु झाली. याचवेळी रुग्णालयात आरोपींना घेऊन आलेल्या ज्ञानेश्वर जारवाल यांनी सिव्हिल ड्रेसवर असताना देखील धावत जाऊन परिस्थिती हाताळली. चाकूने हल्ला करणाऱ्याच्या हातातून चाकू हिसकावून घेत जप्त केला.
Pune Crime: स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडितेला सरकारकडून मिळणार 3 लाखांची मदत
जालना जिल्हा सामान्य रुग्णालयसमोर दोन गटात दगडफेक झाली असताना, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिकचा तपास पोलिस आता करत आहे. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती कदिम पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माने यांनी दिली.