जालन्यातील 'या' भयंकर गुन्ह्यातील आरोपींवर ‘मकोका’ लागणार? काय म्हणाले एकनाथ शिंदे? क्रूर घटनेचा Video पहाच
मुंबई: जालना जिल्ह्यातील भोकरदनमधील कैलास बोराडे यांना झालेल्या मारहाणीची घटना दुर्देवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील गुन्हेगारांना पाठीशी न घालता त्यांना ‘मकोका’ लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत सांगितले.
भोकरदनमधील कैलास बोराडे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी विधान परिषदेत औचित्याच्या मुद्दा सदस्य शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. ते म्हणाले, यासंदर्भात मी जालनाच्या पोलिस अधीक्षकांशी बोललो आहे. जालन्याचे पालकमंत्री त्या ठिकाणी भेट देणार आहेत. बोराडे यांना झालेली मारहाण अतिशय अमानुष आहे. त्या घटनेचा व्हिडीओ बघितल्यावर अंगावर शहारा येतो इतकी अमानुष पद्धतीने मारहाण झाली आहे.
मारहाणीत जखमी झालेल्या बोराडे यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार त्याच्यावर आता उपचार सुरू आहेत. मी देखील बोराडे यांच्याशी फोनवरून बोललो होतो. त्यांची विचारपूस केली सरकार तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाहीही त्यांना दिली. या घटनेतील गुन्हेगारांना अजिबात पाठीशी घालणार नाही. त्यांना ‘मकोका’ लावण्याची प्रक्रिया गृह विभागामार्फत करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
जालनामध्ये अत्याचाराने गाठली परिसीमा
राज्यामध्ये अत्याचाराच्या रोज नवीन घटना समोर येत आहेत. डिसेंबर महिन्यामध्ये झालेल्या संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असताना आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. याचे धक्कादायक असे फोटो देखील समोर आले असून यामुळे राज्यभरामध्ये रोष व्यक्त केला आहे. याचप्रमाणे आता जालनामधील अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आला आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येने क्रौर्याची परिसीमा गाठल्याचे सबंध महाराष्ट्राने पाहिलेले असतानाच आता लातूरच्या जानेफळ गावात महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बोऱ्हाडे या तरूणाची कातडी सोलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लोखंडाच्या तप्त सळईने त्याच्या शरीरावर डागण्या देण्यात आल्या; कारण काय… pic.twitter.com/bSUVT74d9W
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 5, 2025
शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ जालनामधील असल्याचा दावा केला जातो आहे. यामध्ये एका तरुणावरुन काही लोकांकडून अमानूष अत्याचार होत असल्याचे दिसत आहे. कैलास बोराडे असे या तरुणाचे नाव असल्याचे समोर येत आहे. तळपत्या सळईचे चटके हे पीडित तरुणाला दिले जात आहे. तरुणाच्या उघड्या अंगावर हे जळत्या सळईचे चटके दिले जात आहेत.
Jalna Crime : गरम तळपत्या सळईनी कातडी सोलल्या…; जालनामध्ये अत्याचाराने गाठली परिसीमा, Video आला समोर
तापलेल्या रॉडने कैलासच्या पायाला, पोटाला, पाठीला, मानेवर,गळ्याजवळ, दंडावर, डाव्या तळहातावरचटके देत संशयितांनी जीवे मारण्याच्या प्रयत्न केला. जालन्याचे पोलिस प्रशासनाने या घटनेची दखल घेतली असून आरोपीला अटक झाली आहे. तसेच आरोपीवर 307 चा गुन्हा दाखल केला आहे. मात्र या घटनांमुळे माणसांमधील माणूसकी हरवली असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे. महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या या गंभीर घटनांमुळे राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. हा व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.