फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Tiranga Rally: स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शहरात नगरपरिषद व शिक्षण विभागाच्या वतीने छत्रपती संभाजीराजे उड्डाण पुल ते जिल्हा परिषद मैदानपर्यंत भव्य ‘तिरंगा रैली’ चे आयोजन अत्यंत उत्साहात करण्यात आले. या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि भाजपच्या कार्यकत्यांची मोठी उपस्थिती दिसून आली. देशभक्तीची भावना नागरिकांच्या मनात अधिक दृढ व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, एवढ्या मोठ्या आयोजनात सर्वसामान्य नागरिकांचा प्रतिसाद अत्यंत अत्यल्प राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले.
देशपातळीवर हे अभियान राबवले जात असून यात पहिला मान परतूरला मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला की जसा रक्तात उत्साह संचारती, तसा हातात तिरंगा घेतला की प्रत्येक भारतीयाचे रक्त सळसळते.
पगड जातीचा हा देश तिरंग्याच्या छत्रछायेखाली एकत्र यावा,असा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मानस आहे. ९ ते १५ ऑगस्टदरम्यान प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा लावावा, असे आवाहन यावेळ आमदार बबनराव लोणीकर यांनी भाषणातून केले. दे तोडण्याचा प्रयत्न करणा-यांना १४० कोटी जनतेने आपणास भारतीय एक आहोत, हे दाखवून दिले पाहिजे. देशात झालेल मूलभूत विकासामुळे भारत जगातील प्रगत राष्ट्रांच्या यादीमधी ११ व्या क्रमांकावरून थेट ४ व्या क्रमांकावर आला आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला. तसेच यावेळी खात्याच्या वतीने उपस्थितांना व्यसनाधीनतेवर शपथ देण्यात आली.
या कार्यक्रमाला आ. बबनराव लोणीकर, जिल्हामध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा भाजपा युवा नेते राहुल लोणीकर, नगराध्यक्षा प्रियंका राक्षे यांच्या सह उपविभागीय अधिकारी पदमाकर गायकवाड, तहसीलदार दामोधर जाधव, गट विकास अधिकारी कौशल पाटील प्रभारी गटशिक्षणाधिकारी रवी कवडे, पोलिस निरीक्षक सुदाम भागवत यांच्यासह प्रमुख अधिकारी, कर्मचारी, भाजपा कार्यकतें, विद्यार्थी व सर्व शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते.
EdTech career: नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ क्षेत्रात नवपदवीधरांना बक्कळ संधी
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व समन्वयादरम्यान उपविभागीय अधिकारी यांनी सांगितले की, राज्यभरात ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत हे अभियान राबवले जात असून देशभक्तीची भावना जागृत करणे हाच यामागील एकमेव उद्देश आहे.यावेळी बोलताना राहुल लोणीकर म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वातंत्र्यदिनानिमित्त ही रॅली काढण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.






