
ZP SCHOOL
ZP School study tour Hyderabad: राष्ट्रीय आविष्कार अभियानांतर्गत गेवराई तालुक्यातील दिमाखवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पाच विद्यार्थ्यांची हैदराबाद येथील अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या या दौऱ्यात वैज्ञानिक संशोधन, अवकाश विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित संस्थांची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून मिळणार आहे.
दिया दिनेश गुळवे, स्वप्नाली नारायण देवकर, विजय ताराचंद पवार, रणवीर राजेंद्र जायगुडे आणि श्रावणी राजाभाऊ कणसे या विद्यार्थ्यांचा निवड यादीत समावेश आहे. चार दिवसांच्या या शैक्षणिक उपक्रमामुळे अभ्यासक्रमाबरोबरच प्रयोगशील ज्ञानाची जोड मिळणार आहे. राष्ट्रीय आविष्कार अभियानातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, निरीक्षण क्षमता, जिज्ञासा, सर्जनशीलता आणि समस्या सोडविण्याची वृत्ती विकसित करण्यावर भर दिला जातो.
Best career options : इंजिनिअरिंग, एमबीए, लॉ आणि मेडिकल पैकी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या
विज्ञान प्रदर्शन, प्रकल्प, प्रश्नमंजूषा, प्रयोगशाळा भेटी आणि नवोपक्रमाधारित उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते. दिमाखवाडी शाळेतील पाच विद्यार्थ्यांची झालेली निवड ही शाळेसह गावासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शालेय व्यवस्थापन समितीने या विद्याथ्यांचे अभिनंदन केले आहे.
३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत हैदराबाद येथे हा अभ्यास दौरा होणार आहे. वैज्ञानिक संशोधन केंद्रे, अवकाश संशोधनाशी संबंधित संस्था, विज्ञान केंद्रे आणि तंत्रज्ञानविषयक ठिकाणांना भेटी देण्याचा कार्यक्रम आहे.
दिया दिनेश गुळवे, स्वप्नाली नारायण देवकर, विजय ताराचंद पवार, रणवीर राजेंद्र जायगुडे आणि श्रावणी राजाभाऊ कणसे या पाच विद्यार्थ्यांनी निवडीत स्थान मिळविले आहे. त्यांच्या या यशामुळे दिमाखवाडी शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांना नवी ओळख मिळाली आहे.