Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahabaleshwar News: महाबळेश्वरच्या पावलावर पाऊल! जावळी तालुका बनतोय स्ट्रॉबेरी लागवडीचे नवे केंद्र

महाबळेश्वरच्या धर्तीवर आता जावळी तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरी लागवडीला चालना मिळत असून, सुमारे ६०० हेक्टर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी मदर प्लांट लागवडीची तयारी सुरू झाली आहे. यामुळे जावळी तालुका स्ट्रॉबेरी उत्पादनाचे नवे केंद्र म्हणून उदयास येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 10, 2026 | 05:21 PM
महाबळेश्वरच्या पावलावर पाऊल! जावळी तालुका बनतोय स्ट्रॉबेरी लागवडीचे नवे केंद्र

महाबळेश्वरच्या पावलावर पाऊल! जावळी तालुका बनतोय स्ट्रॉबेरी लागवडीचे नवे केंद्र

Follow Us
Follow Us:
  • महाबळेश्वरच्या पावलावर पाऊल
  • जावळीत अंदाजे ६०० हेक्टरवर स्ट्रॉबेरी मदर प्लांट लागवडीची तयारी
  • स्ट्रॉबेरी लागवडीचे केंद्र बनतोय जावळी तालुका
  • ६०० हेक्टरवर मदर प्लांट लागवडीची तयारी
पाचगणी : महाबळेश्वरची ओळख असलेले स्ट्रॉबेरी पीक आता वेगाने जावळी तालुक्यातही विस्तारत असून, यंदाच्या हंगामात जावळी तालुका स्ट्रॉबेरी लागवडीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येत आहे. पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरीच्या मदर प्लांट लागवडीकडे वळत असल्याने तालुक्यातील शेती क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

महाबळेश्वरला देशातील स्ट्रॉबेरीची पंढरी म्हणून ओळख मिळाली आहे. येथील हवामान, जमीन आणि पाणी यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादनाला पोषक वातावरण मिळते. हाच फायदा जावळी तालुक्यातील अनेक भागांनाही होत असल्याने गेल्या काही वर्षांत येथे स्ट्रॉबेरी लागवडीचे क्षेत्र सातत्याने वाढत आहे. यंदा जावळी तालुक्यात सुमारे ५०० ते ६०० हेक्टर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीच्या मदर प्लांटची लागवड होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

आरटीआय कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या तक्रारीला नगराध्यक्ष अमोल मोहितेंचे प्रत्युत्तर; साताऱ्यात अतिक्रमण हटाव मोहीम लवकरच

स्ट्रॉबेरीच्या आधुनिक आणि अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची मागणी वाढली असून, इटली, स्पेन आणि कॅलिफोर्निया येथून आणलेल्या तब्बल १४ विविध जातींचे मदर प्लांट सध्या महाबळेश्वर आणि जावळी तालुक्यात दाखल झाले आहेत. या जातींमधून अधिक दर्जेदार व रोगप्रतिकारक रोपे तयार होत असल्याने शेतकरी त्यांना प्राधान्य देत आहेत.

सध्या तालुक्यात मदर प्लांट लागवडीसाठी शेत तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शेतामध्ये प्लास्टिक मल्चिंग, ठिबक सिंचन व्यवस्था, सेंद्रिय खतांचा वापर तसेच रोपांच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उभारल्या जात आहेत. पुढील काही दिवसांत मदर प्लांटची लागवड सुरू होणार असून त्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर तयारी करत आहेत.

मदर प्लांट लागवडीनंतर त्यापासून निर्माण होणाऱ्या रनर्सच्या माध्यमातून नवीन रोपे तयार केली जातात. ही रोपे महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये विकली जातात. त्यामुळे स्ट्रॉबेरी रोपवाटिका व्यवसायाला मोठी आर्थिक उलाढाल मिळते. एका एकरात साधारणपणे दोन ते अडीच लाख रोपांची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे स्ट्रॉबेरीच्या रोपनिर्मिती व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

यंदा एका मदर प्लांटची किंमत सुमारे ५५ रुपये असून, एका एकरासाठी पाच ते सहा हजार मदर प्लांटची आवश्यकता भासते. त्यानुसार एकरी लाखो रुपयांची गुंतवणूक शेतकऱ्यांना करावी लागत आहे. मात्र तयार होणाऱ्या रोपांना बाजारात मोठी मागणी असल्याने ही गुंतवणूक फायदेशीर ठरत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

कराड उड्डाणपुलाच्या कामाची खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून पाहणी, कामाला गती देण्याच्या सूचना

स्ट्रॉबेरी लागवडीमुळे ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीलाही चालना मिळत आहे. विशेषतः महिलांना मोठ्या प्रमाणावर काम उपलब्ध होत आहे. सध्या शेतामध्ये पिशव्या भरणे, माती तयार करणे, रोपांची निगा राखणे आणि लागवडीपूर्व तयारी अशी विविध कामे सुरू असून महिला शेतमजुरांची लगबग सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतीसोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळत आहे.

महाबळेश्वरनंतर जावळी तालुका आता स्ट्रॉबेरी रोप उत्पादनाचा नवा हब म्हणून विकसित होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार जाती आणि शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद यामुळे आगामी काळात जावळी तालुक्याची ओळखही स्ट्रॉबेरी उत्पादनाच्या नकाशावर अधिक ठळकपणे निर्माण होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Jawali taluka strawberry mother plant cultivation 600 hectare preparation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 05:21 PM

Topics:  

  • Mahabaleshwar
  • Satara

संबंधित बातम्या

‘व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल’; डॉ. नीलम गोऱ्हेंचे ‘महाराजस्व अभियान’वर मोठे विधान
1

‘व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल’; डॉ. नीलम गोऱ्हेंचे ‘महाराजस्व अभियान’वर मोठे विधान

माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड
2

माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड

Satara News: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कर्जमाफीसह वीज थकबाकी माफीचा लाभ
3

Satara News: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कर्जमाफीसह वीज थकबाकी माफीचा लाभ

Youth Protest :जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या समर्थनार्थ साताऱ्यात युवा क्रांतीची रॅली
4

Youth Protest :जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या समर्थनार्थ साताऱ्यात युवा क्रांतीची रॅली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.