
जिल्ह्यातील १३७ मतदान केंद्रांवर प्रशासनाने आवश्यक व्यवस्था
जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी ४७ हजार ४६३, तर शिक्षक मतदारसंघासाठी ९ हजार ४५४ मतदार नोंदणीकृत होते. या मतदारांसाठी अनुक्रमे ९३ आणि ४४ केंद्रांवर मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी निवडणूक यंत्रणेने मनुष्यबळासह पोलिसांचा बंदोबस्त ठेवला होता.
सकाळच्या पहिल्या दोन तासांत पदवीधर मतदारसंघात २४ टक्के, तर शिक्षक मतदारसंघात ३२ टक्के मतदान झाले. त्यानंतर दिवसभर मतदानाचा ओघ सुरू राहिला. दुपारी दोन वाजेपर्यंत शिक्षक मतदारसंघातील मतदान ५९ टक्क्यांवर पोहोचले होते. अखेर मतदानाची वेळ संपल्यानंतर दोन्ही मतदारसंघांतील अंतिम टक्केवारी स्पष्ट झाली. सातारा शहर आणि परिसरातील काही मतदान केंद्रांना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले आणि नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी भेटी दिल्या. जिल्ह्यातील १३७ मतदान केंद्रांवर प्रशासनाने आवश्यक व्यवस्था केली होती. मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी दिली.
मतदान प्रक्रियेची माहिती घेत त्यांनी केंद्रांवरील व्यवस्थेचा आढावा घेतला. दोन्ही मतदारसंघांत विविध राजकीय पक्षांचे उमेदवार रिंगणात असल्याने निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. शिक्षक मतदारसंघातील अपक्ष प्रा. सचिन सानप यांची उमेदवारी आणि त्यांना मिळालेला शिंदे गटाचा पाठिंबा, तसेच पदवीधर मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडीतील लढतीमुळे निवडणुकीची चर्चा रंगली होती. मतदान शांततेत पार पडल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला असून, आता निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.दोन्ही मतदारसंघांची मतमोजणी २७ ऑक्टोबर रोजी पुण्यातील बालेवाडी येथे होणार आहे.
Solapur : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचाच विजय होणार, जयकुमार गोरे
Ans: शिक्षक मतदारसंघात ८९.३९ टक्के, तर पदवीधर मतदारसंघात ६६.९२ टक्के मतदानाची नोंद झाली.
Ans: जिल्ह्यातील १३७ मतदान केंद्रांवर प्रशासनाने आवश्यक व्यवस्था केली होती.