Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati Assembly bypoll Elections 2026: ‘जय पवार आले तर आमचे युगेंद्र पवार तयार!’; रोहित पवारांचे खळबळजनक विधान

कुटुंब एकत्र येण्याबाबत ते म्हणाले, “उद्याच्या काळात परिवार एकत्र यायचा असेल, तर आम्ही विरोधात आहोत. सत्तेत असलेल्या काहींनी पक्षाबाहेर येणे, आमदार आणि कार्यकर्त्यांचा विचार करता, हा निर्णय सोपा नाही.”

  • By anuradha sagar
Updated On: Apr 23, 2026 | 12:44 PM
'फडणवीस साहेब, किती अंधभक्ती करणार?' धर्मेंद्र प्रधानांच्या समर्थनावरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

'फडणवीस साहेब, किती अंधभक्ती करणार?' धर्मेंद्र प्रधानांच्या समर्थनावरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Follow Us
Follow Us:
  • अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चा सुरू
  • 2029 च्या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार अशी लढाई होऊ शकते- रोहित पवार
  • अजितदादांच्या काळातच गेल्या लोकसभा निवडणुकीत ‘पवार विरुद्ध पवार’लढत झाली होती
Baramati Assembly bypoll Elections 2026: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज (23 एप्रिल) ला मतदान प्रक्रिया सुरू आहे. ही मतदान प्रक्रिया सुरू असतानाच दिवंगत अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. २०२९ मध्ये बारामतीच्या निवडणुकीतून जय पवार राजकारणात प्रवेश करतील, असे बोलले जात आहे. यावर जय पवार यांनी मात्र आपल्याला कार्यकर्ता म्हणून काम करायचे असल्याचे सांगितले आहे. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

कार्यकर्ते आणि पक्षाच्या इच्छा असते, ते ऐकावं लागतं. त्यांच्या पक्ष वेगळा आहे. त्यांच्या पक्षाकडून जो निर्णय घेतला जाईल, त्यावेळी सुनेत्रा काकी निवडणूक लढवणार नसतील तर, त्यांच्या जाी जो कोणी निवडणुकीला उभा राहिल. २०२९ची परिस्थिती पाहता सर्वपक्षीय लढाई होण्याची शक्यता आहे. बारामतीत भावनिक दृष्टीकोनातून निर्णय घेत आम्ही सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला. पण आमचे पक्ष वेगळे आहेत. 2029 च्या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार अशी लढाई होऊ शकते. जय पवार उमेदवार असतील तर आमच्या पक्षातून युगेंद्र पवार उमेदवार असू शकतात, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Baramati By-Election: जय पवार होणार बारामतीच्या भविष्याचा चेहरा; उमेदवारीच्या प्रश्नावर काय म्हणाले अजितदादांचे धाकटे चिरंजीव?

राज्याच्या राजकारणात ‘पवार विरुद्ध पवार’ ही लढत यापूर्वी पाहायला मिळाली असून भविष्यातही अशी परिस्थिती उद्भवू शकते, असे स्पष्ट संकेत रोहित पवारांनी दिले. लक्षणीय बाब म्हणजे, बारामती आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले.

रोहित पवार म्हणाले, “अजितदादांच्या काळातच गेल्या लोकसभा निवडणुकीत ‘पवार विरुद्ध पवार’लढत झाली होती. पुढेही अशा निवडणूकांच्या शक्यता नाकारता येणार नाही. पवार परिवार एकत्र यावा, अशी लोकांची इच्छा आहे. ही दादांचीही इच्छा होती. मात्र, राजकीय दृष्टीकोनातून चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात, काही गोष्टींचा त्याग करावा लागतो.”

कुटुंब एकत्र येण्याबाबत ते म्हणाले, “उद्याच्या काळात परिवार एकत्र यायचा असेल, तर आम्ही विरोधात आहोत. सत्तेत असलेल्या काहींनी पक्षाबाहेर येणे, आमदार आणि कार्यकर्त्यांचा विचार करता, हा निर्णय सोपा नाही.”

Baramati Byelection 2026: शरद पवार बारामतीत का येऊ शकले नाहीत?

२०२९ मध्ये पुन्हा थेट लढत?

पुढील निवडणुकांबाबत बोलताना रोहित पवार यांनी सूचक इशारा दिला. “पक्ष वेगळे राहतीलच, कारण आम्ही विरोधी पक्षात आहोत. २०२९ च्या बारामती विधानसभा निवडणुकीत ‘पवार विरुद्ध पवार’ पाहायला मिळू शकते. जय पवार यांच्या विरोधात युगेंद्र उमेदवार असू शकतो,” असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “लोकसभेला आणि विधानसभेला ‘पवार विरुद्ध पवार’ झाले आहे आणि २०२९ मध्येही तसे होऊ शकते. मात्र, अशी लढत व्हावी, ही जनतेची इच्छा नाही.”

राजकीय डावपेचांवर आरोप

या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी काही राजकीय घटकांवर आरोपही केला. “काही जण पवारांकडे चांगल्या नजरेने पाहत नाहीत. पवार कुटुंबाचे वलय संपवावे, अशी काहींची इच्छा आहे. त्यामुळे ‘पवार विरुद्ध पवार’ व्हावे, यासाठी काही जण प्रयत्न करत आहेत,” असा आरोप त्यांनी केला.

Web Title: Jay pawar vs yugendra pawar in 2029 rohit pawar predicts another pawar vs pawar clash in baramati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 12:42 PM

Topics:  

  • MLA Rohit Pawar

संबंधित बातम्या

भाजपच्या विरोधात भूमिका घेण्याचे धाडस दाखवत असतील, तर…; रोहित पवारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टोला
1

भाजपच्या विरोधात भूमिका घेण्याचे धाडस दाखवत असतील, तर…; रोहित पवारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टोला

पुणे विद्यापीठातील प्राध्यापक पदासाठी एक कोटी रुपयांचा ‘रेट’ सुरू; आमदार रोहित पवारांचा दावा
2

पुणे विद्यापीठातील प्राध्यापक पदासाठी एक कोटी रुपयांचा ‘रेट’ सुरू; आमदार रोहित पवारांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.