जेएनपीटी चॅनेल बंद आंदोलन पुढे ढकललं
गेल्या ३८ वर्षाहून जास्त काळ लोटला तरी देखील उरण तालुक्यातील जेएनपीटी विस्थापित शेवा कोळीवाडा गावाचे पुनवर्सन झाले नव्हते. त्यामुळे शासन जाणून बुजून जेएनपीटी विस्थापित शेवा कोळीवाडा यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप याचा निषेध करण्यासाठी उद्या १५ ऑगस्ट रोजी शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटना आणि शेवा कोळीवाडा ग्रामस्थांतर्फे मोरा ते घारापुरी या भागात मासेमारी जमिनीत बेमुदत मासेमारी करण्याचा निर्धार करत जेएनपीटी(जेएनपीए )चे चॅनल बंद आंदोलन करण्याचा संकल्प करण्यात आला होता. मात्र आता हे आंदोलन पुढे ढकलण्यात आलं आहे.
हेदेखील वाचा- शेअर मार्केटमध्ये जास्त पैसे कमविण्याचा मोह भोवला; 48 वर्षीय व्यक्तीला अडीच कोटींचा गंडा
शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटना व शेवा कोळीवाडा विस्थापित ग्रामस्थ यांच्या मागणीचा तातडीने विचार करून प्रशासनाने त्यांची बैठक बोलावली व बैठकीत १३ मागण्या मान्य केल्या. त्यामुळे १५ ऑगस्ट रोजी होणारे जेएनपीटी(जेएनपीए )चे चॅनेल बंद आंदोलन पुढे ढकलण्यात आले आहे. उरण तालुक्यातील जेएनपीटी विस्थापित शेवा कोळीवाडा पुनर्वसन संदर्भात शासनाचे सबंधित विभागाचे अधिकारी, जेएनपीटीचे अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी, शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटना आणि विस्थापित यांची १३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता जेएनपीटी (जेएनपीए) कॉन्फरन्स हॉल तळ मजला प्रशासन भवन, शेवा, नवी मुंबई येथे बैठक झाली.
हेदेखील वाचा- वडोल गावात जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; आरोपीला अटक करण्याची कुटुंबियांची मागणी
बैठकीत जिल्हाधिकारी यांनी शेवा कोळीवाडा विस्थापितांवर केलेले गुन्हे मागे घेणे व हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत विसर्जन करणे, हनुमान कोळीवाडा महसुली गाव अधिसूचना रद्द करणे व जेएनपीटी विस्थापित शेवा कोळीवाडा संक्रमण शिबिराचा सांभाळ जेएनपीए प्रशासन करणार ,संक्रमण शिबिरातील सर्व घरे ,जोती,मंदिरे वगैरे वगैरे चे मूल्यांकन करून चालू बाजार भावानुसार रक्कम देणार आणि २५६ भूखंड व नागरी सुविधेचे भूखंड यांना शेवा सर्व्हे नंबर देण्याचे आणि पुनर्वसनाची कामे चालू करणे बाबतची कामे १ ते १३ मुद्यात अधिकाऱ्यांना विभागून दिलेली आहेत.
हे १३ मुद्दे अलिबाग पुनर्वसन उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जेएनपीटी अध्यक्ष उन्मेष वाघ, जेएनपीएच्या मुख्य प्रबंधक व सचिव मनीषा जाधव, प्रांतधिकारी (उप विभागीय अधिकारी पनवेल) राहुल मुंडके, उरण तहसीलदार उद्धव कदम, उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वठारकर, हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी अश्विनी जाधव, ग्रामसेवक हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत तसेच एमआयडीसी, भूमी अभिलेख, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त राजपूत,अंजुमन बागवान (वरिष्ठ पोलीस निरीक्षक न्हावा शेवा बंदर विभाग) या पोलीस अधिकाऱ्यांसमोर मागण्या मान्य केल्या.
त्यामुळे पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, जेएनपीटी प्रशासन यांच्या विनंतीस मान देऊन उद्याचे जेएनपीटी चॅनेल बंद आंदोलन शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटना आणि विस्थापित यांनी पुढे ढकलले आहे. मात्र मान्य केलेल्या मागण्यांची योग्य अंमलबजावणी न झाल्यास जेएनपीटीचे समुद्रातील चॅनेल बंद करण्याचा इशारा शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेने व शेवा कोळीवाडा विस्थापितानी प्रशासनाला दिला आहे. या बैठकीला शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेतर्फे व ग्रामस्थांतर्फे हनुमान कोळीवाडा ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी, उपाध्यक्ष मंगेश कोळी, माजी सरपंच परमानंद कोळी, ग्रामस्थ -रमेश कोळी, नितीन कोळी, हरेश कोळी, दीप्ती कोळी, ज्योती शेवेकर, उज्वला कोळी, सविता कोळी, प्रणाली कोळी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच परमानंद कोळी यांनी सांगितलं की, ३९ वर्ष उलटून ही शासनाचे माप दंडाणे मंजूर असलेले पुनर्वसन काम चालू करणे व ह. को. ग्रामपंचायत विसर्जन करणे आणि महसुली गावाची अधिसूचना रद्द करणे साठी एनएसपीटी प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा मधील २५६ कुटुंबांनी दि. १५/०८/२०२४ रोजी जेएनपीटीचे चॅनेल बंद आंदोलन जाहीर केले होते.मात्र दि.१३/०८/२०२४ रोजी शासनाने व जेएनपीटी ने बैठक घेवून पुनर्वसन संदर्भात व विविध समस्या संदर्भात मागण्या मान्य केल्याने आंदोलन पुढे ढकलले आहे.