वडोल गावात जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला (फोटो सौजन्य- सोशल मिडीया)
अंबरनाथमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका जुन्या वादातून तरूणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना अंबरनाथ पश्चिमेच्या वडोल गाव परिसरात घडली आहे. रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या हल्ल्यात तरूण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सौरव म्हात्रे (वय २३) असं हल्ला झालेल्या तरूणाचं नाव आहे. रविवारी झालेल्या या हल्ल्याला 2 दिवस उलटले तरिही अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे तरूणाच्या कुटूंबियांनी संताप व्यक्त केला असून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी कुटूंबियांकडून केली जात आहे.
हेदेखील वाचा- 30 रुपये रिक्षाच्या भाड्यावरून झाला वाद, मित्रच मित्राला भिडला; भयंकर शेवट
रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास अंबरनाथ पश्चिमेला असलेल्या वडोल गाव परिसरात सौरव म्हात्रे (वय २३) या तरुणावर जुन्या वादातून जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जखमी सौरभच्या खांद्यावर आरोपीने धारदार चाकू खूपसला असल्याने तो गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला उपचारसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी सौरभच्या खांद्यामध्ये चाकू अडकला होता. शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी हा खांद्यामध्ये अडकलेला चाकू बाहेर काढला. सध्या सौरभवर उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सौरभवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी रोहन जाधव उर्फ वाघ्या (२०) या तरुणावर अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी झालेल्या या हल्ल्याला 2 दिवस उलटले तरिही अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे तरूणाच्या कुटूंबियांनी संताप व्यक्त केला आहे. आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी सौरभच्या कुटूंबियांनी पोलिसांकडे केली आहे.
हेदेखील वाचा- नंदीग्राम एक्सप्रेसच्या स्वच्छतागृहात एकाची गळफास घेऊन आत्महत्या; दादर रेल्वे स्टेशनवरील घटना
याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी सांगितलं की, अंबरनाथ पश्चिमेला असलेल्या वडोल गाव परिसरातील सौरव म्हात्रे या तरुणावर जुन्या वादातून जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यावेळी सौरभच्या खांद्यावर आरोपीने धारदार चाकू खूपसला. या घटनेत सौरव म्हात्रे गंभीर जखमी झाला. चाकू शरीरात अडकलेल्या अवस्थेत सौरभला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रोहन जाधव उर्फ वाघ्या (२०) या तरुणावर अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबरनाथ पश्चिम पोलीस आरोपीचा शोध घेत असून लवकरच आरोपीला अटक केली जाईल.