शेअर मार्केटमध्ये जास्त पैसे कमविण्याचा मोह भोवला (फोटो सौजन्य - pinterest)
ऑनाईलन स्कॅममुळे नागरिकांची फसवणूक झाल्याच्या अनेक घटना तुम्ही आतापर्यंत ऐकल्या असतील. आता अशीच एक घटना अंबरनाथमध्ये देखील घडली आहे. अंबरनाथमध्ये एका 48 वर्षीय व्यक्तीची ऑनाईलन फसवूणक करण्यात आली आहे. नजीर खान (वय ४८) असं या व्यक्तीचं नाव आहे. शेअर मार्केटमध्ये जास्त पैसे कमवण्याचं आमिष आरोपींनी नजीर खान यांना दिलं. या घटनेत नजीर खान यांची तब्बल 2 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. नजीर खान यांना शेअर मार्केटमध्ये जास्त पैसे कमविण्याचा मोह भोवला आहे. त्यांना आरोपींनी ऑनलाईन ट्रेंडीगच्या नादात अडीच कोटींचा गंडा घातला आहे.
हेदेखील वाचा- वडोल गावात जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; आरोपीला अटक करण्याची कुटुंबियांची मागणी
अंबरनाथ पश्चिम येथील नजीर खान यांना ऑनालईन स्कॅमच्या नावाखाली तब्बल अडीच कोटींचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवून जास्त पैसे मिळवण्याचा मोह अंबरनाथ पश्चिम भागातील नजीर खान यांना चांगलाच भोवला आहे. नजीर खान अंबरनाथ पश्चिम येथील वुलन चाळ परिसरात राहतात. आरोपींनी त्यांना शेअर मार्केटमध्ये जास्त पैसे कमवण्याचं आमिष देत त्यांची फसवूणक केल्याचं समोर आलं आहे.
हेदेखील वाचा- 30 रुपये रिक्षाच्या भाड्यावरून झाला वाद, मित्रच मित्राला भिडला; भयंकर शेवट
आमच्या कंपनीच्या मोबाईल अँप किंवा वेबसाईटवर वरून इन्स्टिट्यूशनल ट्रेडिंग केल्यास जास्तीचा परतावा मिळतो, असा दावा आरोपींनी केला होता. या दाव्यावर नजीर खान यांनी विश्वास ठेवला. यानंतर नजीर खान यांनी आरोपींनी सांगितलेल्या वेबसाईटवर वरून इन्स्टिट्यूशनल ट्रेडिंग करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपींनी नजीर खान यांना विश्वासात घेऊन बँक खात्यातून पैसे ट्रान्स्फर करण्यास भाग पडला. यावेळी नजीर खान यांनी आरोपींच्या खात्यात तब्बल 2,51,36,500 रुपये ट्रान्सफर केले. या घटनेनंतर आपली फसवूणक झाली असल्याचे नजीर खान यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली आणि अज्ञात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.
याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ पळसकर यांनी सांगितलं की, अंबरनाथ पश्चिम येथील नजीर खान यांना ऑनालईन स्कॅमच्या नावाखाली आरोपींनी तब्बल अडीज कोटींचा गंडा घातला आहे. आमच्या कंपनीच्या मोबाईल अँप किंवा वेबसाईटवर वरून इन्स्टिट्यूशनल ट्रेडिंग केल्यास जास्तीचा परतावा मिळतो, असा दावा आरोपींनी केला होता. यानंतर आरोपींनी नजीर खान यांना विश्वासात घेऊन बँक खात्यातून पैसे ट्रान्स्फर करण्यास भाग पडला. यावेळी नजीर खान यांनी आरोपींच्या खात्यात तब्बल 2,51,36,500 रुपये ट्रान्सफर केले. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत तीन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस तपास सुरू आहे.