
रंगीबेरंगी फुलांनी बहरले कास पठार; निसर्गाचे अनोखे रूप पाहण्यासाठी दररोज 3 हजार पर्यटकांना संधी
फुलोत्सवासाठी पर्यटकांना www.kas.ind.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. १२ वर्षांवरील पर्यटकांसाठी प्रतिव्यक्ती २०० रुपये प्रवेश शुल्क निश्चित केले आहे. यामध्ये पार्किंगच्या ठिकाणापासून पठारापर्यंतची बससेवा मोफत असणार आहे. प्रत्येक ग्रुपला परिसराची माहितीपत्रिकाही देण्यात येणार आहे. एकीव वॉच टॉवरवरील दुर्बिणीतून कण्हेर जलाशय व परिसराचे विहंगम दृश्य पाहता येणार आहे. तसेच कुमुदिनी तलाव वॉच टॉवरवरून कास तलाव परिसराचे दर्शन घेता येणार आहे.
कास पठारासोबतच परिसरातील अन्य नैसर्गिक स्थळांकडे पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न यंदा करण्यात येत आहे. त्यामध्ये मंडपघळ हे प्रमुख आकर्षण ठरण्याची शक्यता आहे. दऱ्याखोऱ्यांचे विहंगम दृश्य, निसर्गसौंदर्य आणि जैवविविधतेमुळे मंडपघळ पर्यटकांचे लक्ष वेधून घेणार आहे. दरम्यान, कास पठारावर येणाऱ्या पर्यटकांनी फुलांचे संवर्धन करावे, फुलांमध्ये प्रवेश करू नये, तसेच परिसरात स्वच्छता राखावी, असे आवाहन सातारा वन विभाग आणि कास पठार सहा गाव संवर्धन समितीने केले
१२ वर्षांवरील पर्यटक: ₹२०0
शालेय सहल: ₹४० प्रतिविद्यार्थी
गाईड (१० जणांचा ग्रुप): ₹२०० प्रतितास
इलेक्ट्रिक वाहन: ₹१०० प्रतिव्यक्ती
प्रमुख आकर्षणे आणि नियम
नवे आकर्षण: निसर्गसौंदर्य आणि जैवविविधतेने नटलेले ‘मंडपघळ’.
दैनिक मर्यादा: ऑनलाईन माध्यमातून दररोज फक्त ३,००० पर्यटकांना प्रवेश.
आवाहन: फुलांचे संवर्धन करा, फुलांमध्ये प्रवेश करू नका आणि परिसरात स्वच्छता राखा.
“यावर्षी कास पुष्प पठारावर येणाऱ्या पर्यटकांना निसर्गाचे विहंगम दृश्य आणि परिसरातील जैवविविधता पाहायला मिळणार आहे. तसेच मंडपघळ हे पर्यटकांसाठी आणखी एक आकर्षण ठरणार आहे. पर्यटनाचा विस्तार केवळ पठारापुरता मर्याद न ठेवता परिसरातील अन्य नैसर्गिक स्थळांपर्यंत पोहोच करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे.”, अशी माहिती उपाध्यक्ष कास समिती प्रदीप कदम यांनी दिली.